मेडिकलच्या विद्यार्थ्यांना यंदा ऑन जॉब ट्रेनिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:12 AM2020-12-27T04:12:30+5:302020-12-27T04:12:30+5:30
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्राध्यापकांना बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत दोन दिवशीय कार्यशाळेतून ...
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्राध्यापकांना बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत दोन दिवशीय कार्यशाळेतून प्रशिक्षण देण्यात आले. नवीन बदलांनुसार आता कौशल्याधारित अभ्यासक्रम असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना आता यंदापासून ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भारतीय वैद्यकीय परिषदचे (एमसीआय) नाव राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) असे झाले आहे. या आयोगाच्या निर्देशानुसार हे प्रशिक्षण घेणे सक्तीचे आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदवीच्या अभ्यासक्रमात आता बदल झालेला आहे. प्राध्यापकांना अद्ययावत माहिती देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञान युनिटच्यावतीने प्रशिक्षण देण्यात आले. उद्घाटन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेत डॉ. किशोर इंगोले, डॉ. विजय गायकवाड, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. विलास मालकर, डॉ. संगीता गावित, डॉ. इम्रान तेली, डॉ. योगिता सुलक्षणे, डॉ. मोनिका युनाती, डॉ. जितेंद्र सुरवाडे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात ३० प्राध्यापकांचा सहभाग होता. समारोप अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांच्या उपस्थितीत झाला. सहभागींच्यावतीने डॉ. शैला पुराणिक, डॉ. बाळासाहेब सुरोसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेसाठी डॉ. गणेश लोखंडे, विशाल दळवी, प्रदीप जैस्वाल, राकेश सोनार, राकेश पिंपळकर यांनी परिश्रम घेतले.
फोटो आहे.