'त्या' शिक्षण सभापतीविरोधात जोडेमार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 01:05 AM2018-10-28T01:05:06+5:302018-10-28T01:08:43+5:30

विद्यार्थिनीला अश्लिल चित्रफीत दाखविणाऱ्या नगर पालिकेच्या शिक्षण सभापतीला अटक करण्याची मागणी करीत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी जोडेमार आंदोलन केले.

 Jodemaar movement against the 'Teaching' Chairman | 'त्या' शिक्षण सभापतीविरोधात जोडेमार आंदोलन

'त्या' शिक्षण सभापतीविरोधात जोडेमार आंदोलन

Next
ठळक मुद्देआंदोलनकर्त्यांतर्फे तहसीलदार व पोलीस निरीक्षकास निवेदनआंदोलकांच्या घोषणांनी दणाणला परिसर

चाळीसगाव : पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेल्या नगरपालिकेचा शिक्षण सभापती सूर्यकांत उर्फ बंटी ठाकूर याला सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. त्याला अटक करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत भाजपा युवा मोर्चा तर्फे तहसिल कार्यालयाच्या समोर शनिवारी सकाळी ११ वाजता जोडेमार आंदोलन करण्यात आले.
कार्यकर्त्यांनी सूर्यकांत ठाकूर विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यांनतर पोलीस निरीक्षक व तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आंदोलनाला उपस्थितीत भाजपा तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, यु. डी. माळी, नगरसेवक चंदू तायडे, नगरसेविका विजया प्रकाश पवार, विजया पवार, नितीन पाटील, मानसिंग राजपूत, गणेश महाले, बापू अहिरे, सोनाली गुरव, प्रभाकर चौधरी, पं. स. सदस्य सुनील पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हर्षल चौधरी, सरचिटणीस अमोल चव्हाण, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अक्षय मराठे, उपाध्यक्ष कपिल पाटील, अनुसूचित जाती आघाडीचे स्वप्नील मोरे, अल्पसंख्यांक आघाडीचे बबडी शेख, शुभम पाटील, राकेश बोरसे, खुशाल पाटील, प्रवीण पाटील, सचिन दायमा, किशोर गवळी, अनिल गोत्रे, भरत गोरे, कैलास गावडे, राहुल स्वार, शिवाजी मराठे, राहुल पाटील, ज्ञानेश्वर साबळे, शिवराज पाटील, गणेश चौधरी, सुनील रणदिवे, विशाल कारडा, अजय करनकाळ कल्पेश पाटील, भोजराज खैरे, सोनू अहिरे, बाजीराव अहिरे, वाल्मिक महाले, सौरभ पाटील, आदी उपस्थित होते. माळी महासंघ व अभाविपने देखील या घटनेचा निषेध केला असून पोलिस प्रशासनाला निवेदन दिले आहे.



 

Web Title:  Jodemaar movement against the 'Teaching' Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.