भुसावळात ज्वारी खरेदी केंद्र पुन्हा सुरू, मुदत मात्र १५ जानेवारीपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 01:39 AM2019-01-07T01:39:29+5:302019-01-07T01:43:18+5:30
भुसावळ येथील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र पुन्हा पुन्हा सुरू झाले आहे. या खरेदी केंद्राची मुदत केवळ १५ जानेवारीपर्यंत आहे.
भुसावळ : येथील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र पुन्हा पुन्हा सुरू झाले आहे. या खरेदी केंद्राची मुदत केवळ १५ जानेवारीपर्यंत आहे. मात्र शेतकी संघाकडून पुन्हा केवळ एकाच वजन काट्यावर ज्वारी मोजण्यात येत असल्यामुळे उर्वरित २७४ शेतकऱ्यांची ज्वारी केवळ दहा दिवसात कशी मोजली जाणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे .
शेतकी संघाच्या आडमुठ्या धोरणामुळे केवळ शंभर शेतकºयांचीच ज्वारी मोजली जाऊ शकते. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . त्यामुळे पुन्हा दीडशे शेतकरी विक्रीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
येथील शेतकरी संघामध्ये १ नोव्हेंबरपासून आॅनलाइन नोंदणी करण्यात आली होती. ३१ डिसेंबर पर्यंत ही मुदत होती. यात ३६६ शेतकºयांची नावे नोंदवण्यात आली आहे. मात्र गोदामाच्या अडचणीमुळे या खरेदी केंद्राचे उद्घाटन तब्बल दीड महिन्याच्या विलंबानंतर १४ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. तर बारदाना अभावी खरेदी केंद्र १८ डिसेंबर रोजी सुरू झाले होते. ३१ डिसेंबर रोजी शासनाने आॅनलाईन नोंदणी व खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ३१ डिसेंबर पासून खरेदी केंद्र पुन्हा बंद झाले होते. या काळात केवळ ८२ शेतकºयांची अवघी चारशे क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली होती.
त्यावेळी यासंदर्भात आमदार संजय सावकारे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता गोडावून अभावी केवळ ८२ शेतकºयांची ज्वारी खरेदी झाली असल्याची माहिती दिली होती. दरम्यान, आमदार सावकारे यांनी २ जानेवारी रोजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची मुंबई येथे भेट घेऊन किमान नोंदणी झालेल्या शेतकºयांची ज्वारी खरेदी करून घ्यावी, अशी मागणी केली होती. परिणामी पंधरा तारखेपर्यंत खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश ५ जानेवारी रोजी शेतकी संघाला प्राप्त झाले आहेत. मात्र शेतकी संघाने पुन्हा केवळ एकाच वजन काट्यावर अवघे पाच ते सात शेतकºयांची ज्वारी मोजणी सुरू केली आहे . त्यामुळे उर्वरित २७४ शेतकºयांची ज्वारी कधी मोजली जाणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे . त्यामुळे शेतकी संघाने तीन ते चार काटे लावून मिळालेल्या मुदतीत सर्वच शेतकºयांची ज्वारी मोजण्यात यावी अशी मागणी शेतकरी वगार्तून करण्यात आली आहे.
दरम्यान, शेतकी संघाचे सभापती पंढरीनाथ पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आज कार्यालय बंद असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.
‘शेतकी संघाकडून शेतकºयांची अडवणूक का’
ज्वारी खरेदी करण्यासाठी आता मुदतवाढ मिळाली असल्यामुळे या मुदतीत शेतकी संघाने कर्मचारी व दोन ते तीन वजन काटे लावून मुदतीत सर्वच शेतकºयांची ज्वारी मोजून घ्यावी, अशी अपेक्षा आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केली . तर शेतकी संघ केवळ एकाच काट्यावर चार-पाच शेतकºयांची ज्वारी मोजून शेतकºयांची अडवणूक का करीत आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.