अंबाऋषी टेकडी यात्रेच्या आनंदावर यंदाही विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:13 AM2021-07-20T04:13:40+5:302021-07-20T04:13:40+5:30
मात्र, दर्शनासाठी मंदिर खुले राहणार असल्याचे श्री अंबाऋषी मंदिर संस्थान ट्रस्टतर्फे कळविण्यात आले आहे. यासंदर्भात मंदिर ट्रस् ने काढलेल्या ...
मात्र, दर्शनासाठी मंदिर खुले राहणार असल्याचे श्री अंबाऋषी मंदिर संस्थान ट्रस्टतर्फे कळविण्यात आले आहे.
यासंदर्भात मंदिर ट्रस् ने काढलेल्या पत्रात म्हटले आहे की, मागीलवर्षी कोरोनामुळे यात्रा महोत्सव होऊ शकला नाही. तसेच यावर्षीदेखील व्यावसायिकांनी कुठल्याही प्रकारची दुकाने लावू नयेत. २० जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त ध्वजारोहण सकाळी ८ वाजता होईल त्यानंतर कोरोनाचे सर्व नियम पाळून भाविकांना मंदिरात दर्शनासाठी जाता येईल. २१ रोजी अंबाऋषी महाराज यात्रा महोत्सव असून यादिवशीदेखील मंदिर दिवस भर दर्शनासाठी खुले असेल. मात्र, कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करूनच दर्शन दिले जाईल, असे मंदिर संस्थान ट्रस्टचे सचिव ज्ञानेश्वर पाटील यांनी कळविले आहे.
उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी यात्रा रद्द संदर्भात काढलेल्या आदेशातदेखील दुकानदार व नागरिकांनी याची नोंद घेऊन पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. यामुळे यात्रेसाठी उत्साही तरुणांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.