जळगाव येथे वर्सी महोत्सवाला उत्साहात सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:45 PM2019-10-17T12:45:51+5:302019-10-17T12:46:57+5:30
देशभरातून भाविक दाखल
जळगाव : अमर शहिद संत कंवरराम ट्रस्ट व पूज्य सिंधी पंचायत यांच्यावतीने पू़ संत कंवरराम यांचा ६२ वा वर्सी महोत्सव, संत बाबा हरदासराम यांचा ४२ वा तर संत बाबा गेलाराम साहब यांच्या ११ व्या वर्सी महोत्सवास गुरूवारी कंवर नगर परिसरातील पू़ सेवा मंडळ येथे उत्साहात सुरुवात झाली. या महोत्सवासाठी देशभरातील भाविक दाखल झाले आहेत.
१७ रोजी पहाटे ५ वाजता संत बाबा हरदासराम साहेब व संतबाबा गेलाराम साहेब यांच्या समाधीला (देवरी) पंचामृत स्रानाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर सकाळी ९ वाजता विश्वशांती यज्ञ झाला.
महारक्तदान शिबिर
वर्सी महोत्सवानिमित्त २८ व २९ आॅक्टोबर रोजी महारक्तदान शिबिर, रक्तगट तपासणी व अवयवदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पूज्य सिंधी सेंट्रल पंचायतच्यावतीने आयोजित हे शिबिर सकाळी ११.३० ते संध्याकाळी ६ या वेळेत संत बाबा हरदासराम समाज मंदिर येथे होणार आहे.