मुलाची बहिण व मुलीच्या वडिलांना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:13 AM2021-01-04T04:13:33+5:302021-01-04T04:13:33+5:30
प्रेमविवाहानंतर प्रशांत व आरती यांचा मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांवर आरोप केले. त्यामुळे आधी आरतीचे वडील विजय हरसिंग पाटील ...
प्रेमविवाहानंतर प्रशांत व आरती यांचा मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांवर आरोप केले. त्यामुळे आधी आरतीचे वडील विजय हरसिंग पाटील यांनी प्रशांतचे वडील विजयसिंग बाबुराव पाटील, त्याचा मित्र विकास धर्मा कोळी व विक्की उर्फ विजय संतोष बोरसे (रा.पाळधी, ता.धरणगाव), बहिण कविता सुनील पाटील (रा.जळगाव) यांच्याविरुध्द फिर्याद दिली, त्यानुसार कविता वगळता तिघांना शुक्रवारीच अटक झाली होती. प्रशांतचा मृत्यू झाल्यानंतर बहिण कविता हिनेही आरतीच्या वडिलांविरुध्द तक्रार दिल्याने शनिवारी त्यांनाही अटक करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी कवितालाही अटक करण्यात आली. दोघांना रविवारी सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी धरणगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आधी प्रशांतचे वडील व मित्र हे देखील न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पाळधी गावात धग कायम असून पोलिसांनी खबरदारी म्हणून रहिवाशी भागाकडे अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.