पोलीस दलात जम्बो सेवानिवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:13 AM2021-06-01T04:13:26+5:302021-06-01T04:13:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चोपडा विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांच्यासह ३ उपनिरीक्षक, २३ सहायक फौजदार, ९ पोलीस ...

Jumbo retirement in the police force | पोलीस दलात जम्बो सेवानिवृत्ती

पोलीस दलात जम्बो सेवानिवृत्ती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : चोपडा विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांच्यासह ३ उपनिरीक्षक, २३ सहायक फौजदार, ९ पोलीस हेडकॉन्स्टेबल, १ पोलीस नाईक, १ पोलीस शिपाई व एक सफाई कामगार सोमवारी सेवानिवृत्त झाले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंगलम हॉल येथे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात येऊन निरोप देण्यात आला.

चोपडा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र शंकर रायसिंग तसेच जिल्हापेठचे पोलीस उपनिरीक्षक मगन पुंडलिक मराठे, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अडावद पो.स्टे.चे पोलीस उपनिरीक्षक गोकुळसिंग बयास तसेच पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ लिपिक शांताराम विठ्ठल मोरे, सहायक फौजदार रवींद्र पाटील, नामदेव माळी, राजेंद्र महाजन, रमेश पाटील, राजेंद्र कोलते, नागपाल भास्कर, महेबूब तडवी, संतोष पवार, शकुर शेख, रवींद्र माळी, मोहम्मद शेख, रमेश कारले, सलिम पिंजारी, अमृत पाटील, कोमलसिंग पाटील, भागवत गालफाडे, ममराज जाधव, दत्तू खैरनार, अनिलकुमार लोखंडे, पंडीत मराठे, हिरामण तायडे, विश्‍वास पाटील, सुमन पटाईत, तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास राणे, शैला जगतराव बाविस्कर, उत्तम चिकटे, ज्ञानदेव घुले, वसंत मोरे, सुभाष महाजन, मधुकर पाटील, रवींद्र महाले, प्रकाश चौधरी, पोलीस नाईक रघुनाथ कोळी, पोलीस शिपाई शांताराम सोनवणे, सफाई कामगार अशोक गांगाडीया आदी सेवानिवृत्त झाले. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी उपस्थित होते.

Web Title: Jumbo retirement in the police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.