जूनपासून शेतकरी संपावर जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2017 12:37 AM2017-04-10T00:37:52+5:302017-04-10T00:37:52+5:30
चोपडा : 26 रोजी तहसीलवर मोर्चा, शेतकरी कृती समितीचा निर्णय
चोपडा : शेतक:यांना कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी शेतकरी कृती समितीतर्फे तहसीलवर मोर्चा काढण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यातील शेतकरी 1 जूनपासून संपावर जाणार असून, चोपडा तालुक्यातील शेतकरीही संपावर जातील. व फक्त स्वत:पुरते पिकवण्याचा ठराव करण्यात आला.
शेतकरी कृती समितीची बैठक नुकतीच झाली, त्यात वरील निर्णय घेण्यात आला. शेतकरी कृती समितीची बैठक आनंदराज पॅलेसमधील खान्देश शेतकरी उत्पादक कार्यालयात झाली, त्यात वरील निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष संजय पाटील होते. शेतक:यांच्या विविध मागण्यांसाठी 26 रोजी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेण्यात येईल. 24 व 25 एप्रिलला धानोरा ते गलंगी जागृती रॅली तसेच गावागावात सभा घेण्यात येणार आहेत. बैठकीला एस. बी. पाटील, संजीव सोनवणे, डॉ. रवींद्र निकम, भागवत महाजन, संजीव बाविस्कर, किरणसिंग राजपूत, प्रफुल्लसिंग राजपूत, नितीन निकम, नवनीत पाटील, गोटू पाटील आदी उपस्थित होते.
बैठकीत या करण्यात आल्या मागण्या..
हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या निकालात मंजूर केल्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे
सर्व शेतक:यांना सरसकट मुद्दल, व्याजासह कर्जमाफी मिळावी.
शेतक:यांना शेतीसाठी 12 तास किमान वीजपुरवठा व्हावा. पूर्वीप्रमाणे हॉर्सपॉवरवर आधारित बिलाची आकारणी व्हावी.
शेतक:यांच्या मुलांना पूर्णपणे शैक्षणिक फी माफी करावी
शेतमालाचा हमी भाव (उत्पादन खर्चावर किमान 50 टक्के नफा) हा असावा . व हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्यास तेवढी रक्कम अनुदान म्हणून शेतक:यांच्या खात्यावर जमा करावी.
सक्तीची वीज व कर्ज वसुली तत्काळ थांबवावी.