मस्करीस विरोध केल्याने तरुणाला मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 08:12 PM2019-04-11T20:12:31+5:302019-04-11T20:13:48+5:30

मस्करी करण्यास विरोध केल्याने त्या रागातून प्रभाकर माणिक भिल्ल (३२, रा.बिलवाडी, ता.जळगाव) या तरुणाला दिनेश भिवा भिल्ल याने बेदम मारहाण केली व त्यात पोटात दुखापत झाल्याने उपचाराअंती प्रभाकर याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी गुरुवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिनेशविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Junk gets assaulted by maskers; Death during treatment | मस्करीस विरोध केल्याने तरुणाला मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

मस्करीस विरोध केल्याने तरुणाला मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

Next
ठळक मुद्देबिलवाडी येथील घटना संशयिताविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल

जळगाव : मस्करी करण्यास विरोध केल्याने त्या रागातून प्रभाकर माणिक भिल्ल (३२, रा.बिलवाडी, ता.जळगाव) या तरुणाला दिनेश भिवा भिल्ल याने बेदम मारहाण केली व त्यात पोटात दुखापत झाल्याने उपचाराअंती प्रभाकर याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी गुरुवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिनेशविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बिलवाडी येथे ६ एप्रिल रोजी सायंकाळी प्रभाकर व दिनेश भील हे चौकात बसलेले असताना तेथे दिनेश याने प्रभाकर याची मस्करी केली. त्यास त्याने विरोध केला असता दिनेश याला राग आला व त्यातून त्याने प्रभाकर याला पोटात व छातीवर बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तेथे असलेले अशोक काशिनाथ सोनवणे व पांडूरंग दयाराम पाटील यांनी प्रभाकर याची सुटका केली. त्यानंतर प्रभाकर घरी गेला असता पोटात दुखायला लागल्याने रडायला लागला. त्यामुळे पत्नी रुख्मीनी यांनी गावातील डॉ.भरत पाटील यांच्याकडे उपचार केले. दुसºया दिवशी सकाळी म्हसावद येथे उपचार केले. पोटात मार लागल्याने डॉक्टरांनी त्यास जळगाव येथे नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ८ रोजी प्रभाकर याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. १० रोजी रात्री साडे अकरा वाजता त्याचा मृत्यू झाला. 
संशयिताला अटक
दरम्यान, पत्नी रुख्मीनी यांच्या फिर्यादीवरुन दिनेश भिल्ल याच्याविरुध्द गुरुवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर उपनिरीक्षक योगेश शिंदे, बाळकृष्ण पाटील, शशिकांत पाटील व संदीप पाटील यांनी दिनेश याला बिलवाडी येथून अटक केली. प्रभाकर याच्या पश्चात आई, पत्नी व तीन मुली असा परिवार आहे.

Web Title: Junk gets assaulted by maskers; Death during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.