घरफोड्या व दुचाकी लांबविणारी पाचो-याची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:04 PM2017-11-11T23:04:18+5:302017-11-11T23:07:44+5:30

जिल्ह्यात घरफोड्या करुन दुचाकी चोरणा-या टोळीतील पाचोरा येथील तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी जळगाव शहरातून जेरबंद केले. ज्ञानेश्वर रघुनाथ पाटील (वय २० रा.बहिरम नगर, पाचोरा), नवाल आबा राखुंडे उर्फ पिंटू भंडारी (वय २१, रा.सिंधी कॉलनी, पाचोरा) व जीवन सुरेश मोरे (रा.गजानन नगर, पाचोरा) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

Junkie | घरफोड्या व दुचाकी लांबविणारी पाचो-याची टोळी जेरबंद

घरफोड्या व दुचाकी लांबविणारी पाचो-याची टोळी जेरबंद

Next
ठळक मुद्दे‘एलसीबी’ची कारवाई  नकली नोटा प्रकरणातील आरोपी पुन्हा जाळ्यात जळगावात लावला सापळा

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,११:  जिल्ह्यात घरफोड्या करुन दुचाकी चोरणा-या टोळीतील पाचोरा येथील तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी जळगाव शहरातून जेरबंद केले. ज्ञानेश्वर रघुनाथ पाटील (वय २० रा.बहिरम नगर, पाचोरा), नवाल आबा राखुंडे उर्फ पिंटू भंडारी (वय २१, रा.सिंधी कॉलनी, पाचोरा) व जीवन सुरेश मोरे (रा.गजानन नगर, पाचोरा) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.


जळगाव शहरात तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या घरफोडीत पाचोरा येथील तीन जणांचा समावेश असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळाली होती. या तिघांच्या शोधासाठी त्यांनी सहायक फौजदार मुरलीधर आमोदकर, शशिकांत पाटील, शरीफ काझी, संजय पाटील,रवींद्र पाटील, युनुस शेख, विलास पाटील, महेंद्र पाटील, दीपक पाटील,इद्रीस पठाण व दर्शन ढाकणे यांचे पथक जामनेर, पाचोरा, अमळनेर व चाळीसगाव येथे रवाना केले होते. पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागल्याने चोरटे पाचोºयातून निसटले होते. 

जळगावात लावला सापळा
हे चोरटे चोरीची दुचाकी घेऊन सावज शोधायला जळगावात आल्याची माहिती मिळाल्यानंतर हे पथक सकाळपासून त्यांच्या मागावर होते. चोरटे ज्या ठिकाणी येणार त्या ठिकाणी आधीच कर्मचाºयांनी सापळा लावला. दुचाकीवरुन आलेल्या एकाला त्यांनी लागलीच पकडले. त्यानंतर अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आले.


नकली नोटा प्रकरणात आरोपी
पाचोरा-भडगाव परिसरात नकली नोटा तयार करुन त्या वितरीत करण्याचा धंदा स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या वर्षी उघड केला होता. तेव्हा नकली नोटा, प्रिंटर्स व काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यात ज्ञानेश्वर पाटील याचाही समावेश होता. आता हा दुसºयांदा एलसीबीच्या हातात लागला आहे. या तिघांविरुध्द दुचाकी चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी दिली. एमआयडीसीतून चोरी गेलेली दुचाकी या तिघांकडे आढळून आली आहे.

Web Title: Junkie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.