मृत माकडांवर अंत्यसंस्कार करीत जपली भूतदया
By admin | Published: June 24, 2017 06:19 PM2017-06-24T18:19:48+5:302017-06-24T18:19:48+5:30
एकतास येथील ग्रामस्थ करणार माकडांच्या मृत्यूनंतर दशक्रियाविधी व गंधमुक्ती
Next
ऑनलाईन लोकमत
अमळनेर,दि.24-विजेचा धक्का लागून मृत झालेल्या माकड व माकडीणचा एकतास येथे हिंदूधर्म संस्कृती नुसार वाजत गाजत अंत्ययात्रा काढून विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अमळनेर तालुक्यातील एकतास येथे 21 रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास दोन माकड एक नर व एक मादी हे गावात फिरत असतांना त्यांना अचानक विजेचा शॉक लागला. त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. गावातील तरुणांनी दोघांचे शव उचलून गावातील श्रीराम मंदिरात आणले.याठिकाणी सर्व ग्रामस्थांनी हिंदू संस्कृतीप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. यावेळी ग्रामस्थांनी रात्रभर जागरण करीत राम मंदिरात भजन व रामधून लावली. 22 रोजी सकाळी ग्रामस्थांनी बॅन्ड लाऊन व हिंदू परंपरा व रिवाजानुसार नुसार अंत्ययात्रा काढली. चार खांदेकरी व एक मडके धरणा:यासह गावातील पुरुष, महिला व परिसरातील शेकडो नागरिकांची उपस्थिती दिली. ग्रामस्थांनी दशक्रिया विधी व गंधमुक्तीच्या कार्यक्रम 30 जून रोजी सकाळी गावातील श्रीराम मंदिर जवळ करण्याचे निश्चित केले आहे.