अवघ्या १२ मिनिटात कापड दुकान फोडून साडेतीन लाखांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 11:08 PM2020-02-09T23:08:05+5:302020-02-09T23:08:19+5:30
बळीराम पेठेतील घटना : चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, मात्र डीव्हीआर लांबविले
जळगाव : शहर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बळीराम पेठेतील यु.जी.रेडीमेड गारमेन्ट हे कापडाचे दुकान फोडून चोरटयंनी तिजोरीत ठेवलेले साडे तीन लाख रुपयांची रोकड लांबविल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. अवघ्या १२ मिनिटात चोरट्यांनी आपले काम फत्ते केले आहे. दरम्यान, दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहेत. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राम गंगूमल कटारिया (५५,रा. गणेश नगर) यांचे भाजपा कार्यालयाच्या मागे असलेल्या बळीराम पेठेत शेरू अॅण्ड टॉवरच्या पहिल्या मजल्यावर यु.जी.रेडीमेड गारमेन्ट म्हणून दुकान आहे. या दुकानावर गेल्या दोन महिन्यांपासून दोन कर्मचारी तर दोन दिवसांपासून दोन असे एकुण चार कर्मचारी कामाला आहे.
रविवारी सकाळी फर्निचर कामासाठी मिस्तरी दुकानात आले असता त्यानां दुकान फोडल्याचे लक्षात आले. मिस्तरींनी दुकानदार राम कटारिया यांना घटनेची माहिती दिली. कटारिया दुकानावर आले असता त्यांना तिजोरीत ठेवलेले ३ लाख ६५ हजार रूपयांची रोकड गायब झालेली दिसली तर तिजोरी फोडलेली होती.
सीसीटीव्हीचे डीव्हीआरही लांबविले
दुकान मालकांनी पहिल्या मजल्यावर लावलेले सीसीटीव्हीचे डीव्हीआर देखील चोरट्यांनी तोडून लंपास केले आहे. दरम्यान इमारतीवर जाण्यासाठीच्या जिन्याला लावलेल्या कुलूपही तोडून त्यांनी आत प्रवेश केला होता. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यावेळी दोन चोरटे रात्री १.२३ चोरी करण्यासाठी आत प्रवेश करत दुकान फोडून अवघ्या १२ मिनीटात चोरी करून रोकड लंपास केली आहे.
कटारीया यांनी शहर पोलीसांना घटनेची माहिती दिली व घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आहे. दरम्यान दुकानावरील काम करणाºया कर्मचारी यांच्याशिवाय इतरांना तिजोरीत रक्कम असल्याचे माहिती नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचीही पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे.