फक्त एकच जागा, दिग्गज मैदानात
By admin | Published: January 5, 2016 01:19 AM2016-01-05T01:19:01+5:302016-01-05T01:19:01+5:30
जामनेर : शहरातील नगरपालिकेची सत्ता गमावल्या नंतर काँग्रेस आघाडीला आता एका जागेसाठी होणा:या पोटनिवडणुकीसाठी चांगलाच जोर चढल्याचे दिसते.
जामनेर : शहरातील नगरपालिकेची सत्ता गमावल्या नंतर काँग्रेस आघाडीला आता एका जागेसाठी होणा:या पोटनिवडणुकीसाठी चांगलाच जोर चढल्याचे दिसते. प्रभाग क्रमांक एकमधील फक्त एका जागेची पोटनिवडणूक येत्या 10 जानेवारी रोजी होऊ घातली आहे. त्यासाठी चक्क काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संजय गरुड आणि माजी नगराध्यक्ष आदी दिग्गज प्रचार रॅलीत सामील झाले. सोमवारी काँग्रेस आघाडीकडून जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली़ राष्ट्रवादीचे प्रा. शरद पाटील, शंकर राजपूत, भगतसिंग पाटील, बंटी भैया, प्रा. उत्तम पवार, अजय पाटील, रघुनाथ धनगर, जगन लोखंडे, दीपक मिस्तरी, पिंटू चिप्पड, नामदेव पालवे आदी यात सहभागी झाले होत़े प्रभाग क्रमांक एकमधील एका जागेवर भाजपाच्या सुनीता संजय नेमाडे तर काँग्रेस आघाडीच्या लीलाबाई संतोष बोरसे यांच्यात समोरासमोर लढत होणार आहे. नगरपालिकेच्या इतिहासातील पहिलीच पोट निवडणूक असल्याने या होणा:या निवडणुकीविषयी मतदारांनाही मोठी उत्सुकता असल्याचे दिसून येते. अडीच वर्षापूर्वी या प्रभागातून काँग्रेस आघाडीचे चारही उमेदवार विजयी झाले होते. त्यातून काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष शंकर बेनाडे (राजपूत) यांच्या पत्नी मथुराबाई बेनाडे (राजपूत) यांच्या जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांना नगरसेवक पदावरून अपात्र ठरविण्यात आले होते. त्या रिक्त जागेवर ही निवडणूक होते आहे. प्रतिष्ठा लागणार पणाला अडीच वर्षापूर्वी भाजपाच्या कब्जातून काँग्रेस आघाडीने सत्ता हिसकावून घेतली होती, पण आपसातील सुंदोपसुंदीमुळे अडीच वर्षातच सत्ता गमाविण्याची पाळी त्यांचेवर आली़ आणि भाजपाच्या साधना महाजन नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या. भाजपाच्या हाताता सत्ता असली तरी कागदोपत्री बहुमत काँग्रेस आघाडीचेच दिसते. यामुळे एका जागेच्या निवडणुकीसाठी भाजपा आणि आघाडी यांची चांगलीच प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याचे दिसते. येत्या 10 जानेवारी रोजी मतदान तर 11 जानेवारी रोजी मतमोजणी होईल. कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होतो, याकडे सर्वाचे लक्ष लागून आह़े (वार्ताहर)