न्या.पी.बी. सावंत यांनी केली होती जळगाव पालिकेची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:18 AM2021-02-16T04:18:21+5:302021-02-16T04:18:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे सोमवारी पुणे येथे निधन झाले. अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे सोमवारी पुणे येथे निधन झाले. अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती म्हणून पी.बी. सावंत यांची ओळख होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचा निकाल लागला. जळगाव पालिकेतील घरकूल, अटलांटा, वाघूर प्रकरणातील भ्रष्टाचारांबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व माजी नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर चौकशीसाठी स्थापन आयोगाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती सावंत यांनी काम पाहिले होते. पुणे येथील कृषी महाविद्यालयात शासनाने जागा उपलब्ध करून दिली होती. त्यावेळी माजी नगरसेवक नरेंद्र पाटील हे तब्बल महिनाभर सावंत यांच्यासोबतच्या चौकशीला उपस्थित होते. महिनाभर ही चौकशी चालली होती. त्यानंतर सावंत यांनी पालिकेतील भ्रष्टाचाराबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला होता. या चौकशीच्या अनुषंगाने न्या.सावंत यांचा जळगावशी सबंध आला.