के۔ के۔ उर्दू विद्यालयात मातृभाषा दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:10 AM2021-02-22T04:10:51+5:302021-02-22T04:10:51+5:30
जळगाव : के. के उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक मातृभाषा दिना निमित्त बहुभाषिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ...
जळगाव : के. के उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक मातृभाषा दिना निमित्त बहुभाषिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक अकिल खान बियावली अध्यक्षस्थानी होते. उर्दू अशी भाषा आहे की यामध्ये जागतिकस्तरा चा ठेवा आहे, असे विचार त्यांनी यावेळी मांडले.
तबरेज शेख, मझहरोदीन शेख, तन्वीर इकबाल शेख यांनीही मार्गदर्शन केले. इरम अस्लम व नुजहत शेख यांच्यासह विद्यार्थिनींनी विचार व्यक्त केले. शाकेरा अलतमश बागबान ने कोरोना वर आधारित कविता सादर केली. जाकीर शाह, मुश्ताक भिस्ती, शकीला शेख, जमीला शेख, नाजिया शेख, असमा शेख नसरीन काद्री, मोहसीन शाह आदी उपस्थित होते. सानिया व मुस्कान बागवान यांनी सूत्रसंचालन केले.