कडब्यासोबत नोटाही रगडल्या!

By admin | Published: February 15, 2017 12:19 AM2017-02-15T00:19:45+5:302017-02-15T00:19:45+5:30

पाचशे रुपयांच्या जुन्या चलनाचीही कुट्टी : ‘कुटार’मधील ‘टुकार’ प्रकार

Kadabya with notes stuck! | कडब्यासोबत नोटाही रगडल्या!

कडब्यासोबत नोटाही रगडल्या!

Next

चिनोदा ता. तळोदा : कडब्यासोबत चलनातून बाद झालेल्या पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा कापल्या गेल्याचा प्रकार  चिनोदा येथे समोर आला असून या नोटा कडब्यात कोणी टाकल्या हे मात्र अद्याप उघड झालेले नाही़
पोपट संतोष पाटील यांच्या खळ्यात कडब्याची कुट्टी करण्यासाठी मंगळवारी सकाळी मशिन सुरू झाल़े
 कटाई सुरू असतानाच मजुरांना पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांचे तुकडे दिसून आल़े मजुरांनी ही माहिती  पोपट पाटील यांना दिली़ त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांचे असंख्य तुकडे कुट्टीत दिसून आल़े (वार्ताहर)
पन्नास हजारांच्या नोटा
ही वार्ता गावात पसरल्यानंतर ग्रामस्थांनी खळ्याकडे धाव घेतली़ मात्र तोवर मजुरांनी नोटांचे तुकडे उचलून नेले होत़े कडब्यासोबत कटाई झालेल्या नोटा साधारण 50 हजार रूपये मूल्याच्या असल्याचे सांगण्यात आले. नोटा नेमक्या कोणाच्या, कोणी लपवल्या याबाबतच्या चर्चेला गावात ऊत आला आह़े 
चा:याची आवश्यकता असल्याने ज्वारीचा कडबा खरेदी केला होता़  या कडब्याची कटाई  करण्यात येत असतानाच मजुरांना मशिनीत टाकलेल्या कडब्याच्या एका गड्डीतून नोटांचे तुकडे येत असल्याचे दिसून आले. 
    -पोपट संतोष पाटील, शेतकरी, चिनोदा़ता़तळोदा़

Web Title: Kadabya with notes stuck!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.