कहर...कोरोनाची शंभरी नव्हे दीडशे पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:42 AM2021-02-20T04:42:59+5:302021-02-20T04:42:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाचा विस्फोट झाला असून १६९ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या चार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाचा विस्फोट झाला असून १६९ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या चार दिवसात दुसऱ्यांदा शंभरापेक्षा अधिक रुग्ण समोर आले आहेत. यात गंभीर बाब म्हणजे शहरात ८४ बाधित समोर आले आहे. दरम्यान, गुरुवारी आरटीपीसीआरच्या २११ अहवालांमध्ये तब्बल ७६ जण बाधित आढळून आले आहे. ही पॉझिटिव्ही तब्बल ३६ टक्के नोंदविण्यात आली आहे.
गेल्या चार दिवसांपामध्ये दुसऱ्यांदा शंभरापेक्षा अधिक रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. यात शहरात तब्बल ८४ रुग्ण आढळून आले. नवे रुग्ण आणि बरे होणारे रुग्ण यात तिपटीने फरक असल्याने सक्रीय रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून ६६७ वर पोहोचली आहे.
चाचण्या आणि अहवाल असे
आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल : २११, बाधित ७६
ॲन्टीजन : ७०५, बाधित ९३
तालुक्यात रुग्ण असे
जळगाव ८४, ग्रामीण ५, भुसावळ १२, अमळनेर ५, चोपडा ४, पाचोरा १, धरणगाव ५, यावल १, जामनेर ६, रावेर ३, पारोळा ७, चाळीसगाव २३, मुक्ताईनगरात १० असे रुग्ण आढळून आले आहेत.