कलगी तुरा - खडसे समर्थकांनी व्हायरल केले राष्ट्रवादीत प्रवेश करणारे भाजप पदाधिकारी असल्याचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 04:09 PM2020-11-04T16:09:00+5:302020-11-04T16:09:39+5:30

माजी मंत्रीद्वय गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांच्यातील कलगीतुरा वाढत आहे.

Kalgi Tura - Khadse supporters go viral. Photo of BJP office bearers entering NCP | कलगी तुरा - खडसे समर्थकांनी व्हायरल केले राष्ट्रवादीत प्रवेश करणारे भाजप पदाधिकारी असल्याचे फोटो

कलगी तुरा - खडसे समर्थकांनी व्हायरल केले राष्ट्रवादीत प्रवेश करणारे भाजप पदाधिकारी असल्याचे फोटो

googlenewsNext

मुक्ताईनगर, जि.जळगाव : माजी मंत्रीद्वय गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांच्यातील कलगीतुरा वाढत आहे. ह्यमंगळवारी भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले कार्यकर्ते भाजपचे नाहीत. उसने अवसान आणण्याचा हा कार्यक्रम होताह्ण, असे उत्तर जामनेर भाजपने दिल्यानंतर खडसेंच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रवेश घेणाऱ्यांचे भाजप सदस्यत्व आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतचे फोटो व्हायरल करून शिमगा दिला.
जामनेर तालुक्यातील देवपिंप्री आणि नेरी बुद्रूक येथील २०० कार्यकर्त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री खडसे यांनी अधिकृतरित्या ट्विटरवरून ही माहिती दिली.
दरम्यान, ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यातला एकही कार्यकर्ता भाजपचा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने उसने अवसान आणून सनसनाटी निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता, यात एकही भाजपचा प्राथमिक सदस्य नाही, असे जामनेर भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी प्रसिद्धीस दिले. यावर खडसेंच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रवेश करणाऱ्यांचे प्राथमिक सदस्यत्व आणि माजी मंत्री महाजन यांच्यासोबत या कार्यकर्त्याचे असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून प्रतिउत्तर दिले आहे. अद्याप यावर भाजप गोटातून प्रतिक्रिया आलेली नाही. एक मात्र निश्चित या प्रवेशामुळे सोशल मीडियात आरोप प्रत्यारोपात खडसे समर्थक भारी पडल्याचे काही व्हाट्सएपच्या ग्रुपवर दिसून आले.
विशेष म्हणजे कोणत्याही निवडणुका नसताना कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशावर आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत असल्याने निवडणुका नसताना निवडणुकीचा भास मात्र जाणवत आहे.

Web Title: Kalgi Tura - Khadse supporters go viral. Photo of BJP office bearers entering NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.