कानळदा रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:22 AM2021-08-28T04:22:01+5:302021-08-28T04:22:01+5:30

जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागातून जाणाऱ्या कानळदा रस्त्यालगत केसी पार्क परिसरात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने ...

Kanalada road repairs started | कानळदा रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

कानळदा रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

Next

जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागातून जाणाऱ्या कानळदा रस्त्यालगत केसी पार्क परिसरात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने प्रश्न मांडल्यानंतर आता मनपा प्रशासनाला जाग आली असून, शुक्रवारी या रस्त्याचा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडेदेखील अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन, पालकमंत्र्यांनी प्रशासनाला या रस्त्याचा दुरुस्तीचे आदेश दिले होते. हे दुरुस्ती तात्पुरती असली तरी याठिकाणी नवीन रस्त्यांचा कामाला सुरुवात करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

केळीचे भाव वाढले

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून केळीच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा चिंता वाढल्या होत्या. मात्र, आता केळीच्या दरात २०० ते ३०० रुपयांची वाढ होऊन आता १३०० रुपयांपर्यंत केळीचे दर पोहचल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मार्च अखेरपर्यंत हे दर १५०० पर्यंत होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी दरात सातत्याने घट होत होती. आता दर वाढले आहेत.

Web Title: Kanalada road repairs started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.