कनाशीत फुलला भक्तीचा मळा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 09:47 PM2019-07-16T21:47:11+5:302019-07-16T21:47:16+5:30
गोंडगाव, ता.भडगाव : कनाशी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त दाढविशेष यात्रोत्सवास भाविकांची आलोट गर्दी झाली होती. यानिमित्ताने श्री.गोविंदप्रभू यांच्या दाढविशेषाला पहाटे मंगलस्नान ...
गोंडगाव, ता.भडगाव : कनाशी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त दाढविशेष यात्रोत्सवास भाविकांची आलोट गर्दी झाली होती.
यानिमित्ताने श्री.गोविंदप्रभू यांच्या दाढविशेषाला पहाटे मंगलस्नान घालण्यात आले. पहाटे साडेपाच वाजता महंतांच्या हस्ते महापूजा व महाआरती झाली. सकाळी सहापासून दाढदर्शन सुरी झाले. दर्शनासाठी जिल्ह्यासह परराज्यातील भाविकांनी हजेरी लावली. दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. येणाऱ्या भाविकांची राहण्याची व महाप्रसादाची व्यवस्था खामणीकर बाबांनी केली होती . यात्रोत्सवासाठी संपूर्ण महानुभाव परिवार, पुजारी व गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ, सर्वज्ञ युवा प्रतिष्ठान व शिवराजे मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभत आहे. यात्रात्सोव शांतेत पार पाडण्याकामी भडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही यात्रा सुमारे १५ दिवस चालते.