किन्हीत लाखाची विदेशी दारू जप्त

By admin | Published: April 11, 2017 12:19 AM2017-04-11T00:19:06+5:302017-04-11T00:19:06+5:30

धडक कारवाईने खळबळ : अंजाळे शिवारात 58 हजारांची गावठी दारू नष्ट

Kanitha Lakha's foreign liquor seized | किन्हीत लाखाची विदेशी दारू जप्त

किन्हीत लाखाची विदेशी दारू जप्त

Next

भुसावळ / यावल : अवैधरीत्या दारूची विक्री होत असल्याच्या माहितीनंतर भुसावळ तालुक्यातील किन्ही येथे लाखाची विदेशी दारू जप्त करण्यात आली तर यावल तालुक्यातील अंजाळे येथे 58 हजारांच्या गावठी दारूसह रसायन नष्ट करण्यात आल़े दरम्यान, या कारवाईने अवैधरीत्या व्यवसाय करणा:यांमध्ये मोठी खळबळ उडाली आह़े
4किन्हीत लाखाची दारू जप्त भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील दगडू राजाराम येवले यांच्याकडे अवैधरीत्या मोठय़ा प्रमाणावर मद्याचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सोमवारी दुपारी तालुका पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 96 हजार 640 रुपयांचे मद्य जप्त करण्यात आल़े सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब गायधनी, पोलीस उपनिरीक्षक सचिन खामगड तसेच पोलीस कर्मचा:यांचा कारवाईत सहभाग होता़ अंजाळेत 58 हजारांचे रसायन नष्टयावल- तालुक्यातील अंजाळे येथील तापी नदीपात्रातील तीन हातभट्टींवर पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्यासह पथकाने सोमवारी पहाटे धाड टाकत 110 लीटर  गावठी दारूसह 58 हजार रुपयांचे कच्चे रसायन नष्ट केल़े
अंजाळे येथील राजेंद्र सोनवणे, गोपाळ सपकाळे, भिका सपकाळे यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियमनाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी पहाटे सहा वाजता येथील फौजदार अशोक अहिरे, हवालदार संजीव चौधरी, राहुल चौधरी, राहुल पांचाळ यांच्या  पथकाने ही कारवाई केली आहे.
किन्हीत लगAसराईनिमित्त जमवला मद्याचा साठा
4भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील संशयित आरोपीने गावात असलेल्या लगAांचा हंगाम पाहता ब:हाणपूर (मध्य प्रदेश) येथून दारूचा साठा आणला होता़ भुसावळ तालुका पोलिसांना खब:यांकडून दारूसाठा करण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर परिवेक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, पोलीस निरीक्षक बाळासाहेब गायधनी व सहका:यांनी अचानक छापा टाकत आरोपीच्या ताब्यातून मद्याचा साठा जप्त केला़ आरोपीला न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आल्याचे गायधनी यांनी सांगितल़े
किनगावात 14 हजार 500 रुपयांचा साठा जप्त
4फैजपूर उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने किनगाव येथील लुकमान इस्माईल तडवी याच्याकडून 35 देशी दारूच्या बाटल्या व 12 हजार 500 रुपयांची रोकड असा 14 हजार 500 रुपयांचा माल जप्त झाला़

Web Title: Kanitha Lakha's foreign liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.