पारोळा तालुक्यातील कंकराज धरण पुनर्भरणाने भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 06:23 PM2020-08-30T18:23:54+5:302020-08-30T18:24:10+5:30

कंकराज लघुपाटबंधारे तलाव १०० टक्के भरला आहे.

Kankraj Dam in Parola taluka filled up by recharge | पारोळा तालुक्यातील कंकराज धरण पुनर्भरणाने भरले

पारोळा तालुक्यातील कंकराज धरण पुनर्भरणाने भरले

googlenewsNext

रावसाहेब भोसले
पारोळा : तालुक्यातील कंकराज लघुपाटबंधारे तलाव पुनर्भरण करण्यासाठी बोरी उजवा कालव्याने सोडण्यात आलेल्या पाण्याने ३० आॅगस्ट रोजी १०० टक्के भरला आहे.
या वर्षी बोरी धरण जुलै महिन्यात १०० टक्के भरले असल्याने बोरी धरणातून हजारो क्यूसेस पाणी वाया जात होते मग या वाया जाणाऱ्या पाण्यातून कंकराज धरणाचे पुनर्भरण केले जावे यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी अधिकारी वर्गाला पाटचारीतून हे पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या.
गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ध.ब.बेहेरे, उपविभागीय अभियंता एम.आर.मिठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता अजिंक्य जे.पाटील, पी.जे.काकडे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व्ही.एम.पाटील, नाना पाटील, शशिकांत पाटील, कालवा निरीक्षक अतुल पाटील तसेच पाटबंधारे विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी कंकराज तलाव पुनर्भरणाचे काम पूर्ण झाले.
बोरी धरणातून १ जुलै रोजी बोरी उजवा कालव्याने कंकराज तलाव पुनर्भरणासाठी पाणी सोडण्यात आले होते. बोरी धरण ते कंकराज तलावाचे अंतर ३२ कि.मी. आहे. २१ कि.मी. पाणी कालव्याद्वारे व पुढे नाल्याव्दारे कंकराज प्रकल्पात सोडण्यात येते.
कंकराज, ता पारोळा येथील धरण बोरीच्या वाया जाणाºया पाण्यातून पुनर्भरण करून १०० टक्के भरण्यात आले धरणातून पाणी ओसंडून वाहत आहे.
तालुक्यातील प्रकल्पांची स्थिती
बोरी (१०० टक्के)
म्हसवा ल.पा. (५० टक्के)
शिरसमणी ल.पा. (१.५० टक्के)
पिंपळकोठा, भोलाने ल.पा. (१०० टक्के)
भोकरबारी म.प्र. (१२ टक्के )
कंकराज ल.पा. (१०० टक्के)

Web Title: Kankraj Dam in Parola taluka filled up by recharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.