मारवड येथील करण साळुंखेने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मिळवले गोल्ड व सिल्व्हर मेडल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:18 AM2021-09-22T04:18:32+5:302021-09-22T04:18:32+5:30
हरियाणा येथे पार पडलेल्या सातव्या स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन राष्ट्रीय स्पर्धेत १५ राज्यातील सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ...
हरियाणा येथे पार पडलेल्या सातव्या स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन राष्ट्रीय स्पर्धेत १५ राज्यातील सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात सर्व विद्यार्थी खेळाडूसाठी ऑलिम्पिक स्पर्धेच्या धर्तीवर सर्व स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यंदा या स्पर्धेचे सातवे वर्ष होते. यात मारवड येथील करण साळुंखे याने महाराष्ट्र राज्य कब्बडी संघाचे प्रतिनिधित्व केले व लाँग स्पर्धेत भाग घेतला. तसेच सनी संजय साळुंखे, कुंदन माधव कोळी यांनीही तीन हजार मीटर रनिंग स्पर्धेत भाग घेतला होता. यात करण सुनील साळुंखे याने लाँग जम्प स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवले. तसेच महाराष्ट्र कब्बडी संघाचे प्रतिनिधित्व करताना सिल्व्हर मेडल पटकावले.
त्याला कबड्डी प्रशिक्षक राहुल पेंडकर (अमरावती), अथेलेटिक कोच योगेश चौधरी (जळगाव), राजेंद्र सूर्यवंशी, एस. पी. वाघ, माजी सैनिक गोविंदा साळुंखे, राहुल देवरे यांच्यासह आजोबा प्रभाकर रावसाहेब मोतीराम साळुंखे, वडील सुनील साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.
-------
फोटो नंबर २२ आरएमएम ०2