जळगावात विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा कराटे प्रशिक्षक पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 05:52 PM2018-10-29T17:52:07+5:302018-10-29T17:57:29+5:30

पोलीस स्केटींग क्लब येथे कराटे प्रशिक्षणासाठी येत असलेल्या १२ वीच्या विद्यार्थिनीवर प्रशिक्षक पोलीस कॉन्स्टेबल विनोद पितांबर अहिरे याने त्याच्या घरी तसेच हॉटेलमध्ये अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Karate Coach police suspended the girl student in Jalgaon suspended | जळगावात विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा कराटे प्रशिक्षक पोलीस निलंबित

जळगावात विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा कराटे प्रशिक्षक पोलीस निलंबित

Next
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांच्या दालनातूनच ठोकल्या बेड्याकागदपत्रे घेण्याच्या बहाण्याने घरी बोलवित केला अत्याचारएस.पीं.च्या दालनातच उतरविला पोलिसाचा गणवेश

जळगाव : पोलीस स्केटींग क्लब येथे कराटे प्रशिक्षणासाठी येत असलेल्या १२ वीच्या विद्यार्थिनीवर प्रशिक्षक पोलीस कॉन्स्टेबल विनोद पितांबर अहिरे याने त्याच्या घरी तसेच हॉटेलमध्ये अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी अहिरे याला कामानिमित्ताने दालनात बोलावून तेथेच बेड्या ठोकून जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. अहिरे याच्याविरुध्द बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी संशयित पोलीस कर्मचारी विनोद अहिरे याला निलंबित करण्यात आले आहे.
कागदपत्रे घेण्याच्या बहाण्याने घरी बोलवित केला अत्याचार
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मुळ जळगाव तालुक्यातील एका गावातील रहिवाशी व सध्या शिक्षणानिमित्त मावशीकडे शहरात एक बारावीची विद्यार्थिनी वास्तव्याला आहे. पोलीस स्केटींग क्लब येथे तीने कराटेचा क्लास लावला होता. तेथे प्रशिक्षक असलेला कॉन्स्टेबल विनोद अहिरे याने त्या विद्यार्थिनीशी जवळीक वाढवून मैत्री केली. क्लासला येण्यापूर्वी कागदपत्रे घेण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला दक्षता नगरातील पोलीस लाईनीतील घरी बोलावले व तेथे कोणी नसल्याची संधी साधून अहिरे याने जबरदस्तीने पीडितेवर अत्याचार केला. या प्रकरणाची माहिती कोणाला सांगितली तर मी पोलीस आहे, काहीही करु शकतो, तुझ्या भावाला जीवंत ठेवणार नाही असे सांगून धमकावले.
एस.पींनी कामानिमित्त बोलावले
अहिरेच्या कारनाम्याविषयी कुटुंबीयांनी रविवारी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची भेट घेऊन माहिती दिली. हा प्रकार ऐकून शिंदे यांनाही धक्का बसला. त्यांनी कार्यालयीन काम असल्याचे सांगून अहिरे याला आपल्या दालनात बोलावून घेतले. तर त्याआधी स्थानिक गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख यांनाही बोलावून पीडितेचा जबाब घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार देशमुख यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला पीडितेचा जबाब नोंदविला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी पोलीस अधीक्षकांनी संशयित आरोपी विनोद अहिरे याला निलंबित केले आहे.
एस.पीं.च्या दालनातच उतरविला पोलिसाचा गणवेश
पीडितेवरील अत्याचार व अटकेबाबत प्रचंड गोपनीयता बाळगून शिंदे यांनी तब्बल चार तास अहिरे याची चौकशी केली. शासकीय गणवेशातच तो दालनात आला होता. त्यामुळे शिंदे यांनी आधी त्याचा गणवेश उतरविला. यावेळी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनाही बोलावण्यात आले होते. खासगी गणवेश परिधान केल्यानंतर अहिरे याला अटक करण्याचे आदेश शिंदे यांनी निरीक्षक सुनील गायकवाड यांना दिले. त्याला पोलीस घेऊन जात असताना हातात बेड्या नसल्याचे पाहून शिंदे यांनी बेड्या आणायला लावून त्याच्या हातात बेड्या ठोकल्या. रात्री त्याला जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या कोठडीत टाकण्यात आले.या घटनेने खाकी डागाळली आहे.

Web Title: Karate Coach police suspended the girl student in Jalgaon suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.