क्षमतेपेक्षा अधिक डेसीबलचे डि.जे.चा वापर केल्याप्रकरणी आजी माजी नगरसेवकांसह ३२ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 03:07 PM2019-04-15T15:07:09+5:302019-04-15T15:09:42+5:30

तीन डि.जे.जप्त : सहायक पोलीस अधीक्षकांची कारवाई

kasamataepaekasaa-adhaika-daesaibalacae-daijaecaa-vaapara-kaelayaaparakaranai-ajai-maajai | क्षमतेपेक्षा अधिक डेसीबलचे डि.जे.चा वापर केल्याप्रकरणी आजी माजी नगरसेवकांसह ३२ जणांवर गुन्हा दाखल

क्षमतेपेक्षा अधिक डेसीबलचे डि.जे.चा वापर केल्याप्रकरणी आजी माजी नगरसेवकांसह ३२ जणांवर गुन्हा दाखल

Next


जळगाव : कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता श्रीराम नवमीनिमित्त मिरवणूक काढून क्षमतेपेक्षा अधिक डेसीबलचे वाद्य व डि.जे.चा वापर केल्याप्रकरणी नगरसेवक मुकुंदा भागवत सोनवणे, माजी नगरसेवक प्रशांत पाटील यांच्यासह ३२ जणांविरुध्द मध्यरात्री शनी पेठ पोलिसात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच तीन डि.जे.जप्त करण्यात आले आहेत.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मुकुंदा भागवत सोनवणे, माजी नगरसेवक प्रशांत पाटील, युवराज भागवत सोनवणे, गोविंदा कुंभार, प्रशांत सुरेश माळी, निलेश जोशी (सर्व रा. शनी मंदिर परिसर), संजय सूर्यवंशी, हरीष बडगुजर व इतर ५ ते ६ कार्यकर्ते
दुसऱ्या गुन्ह्यात निलेश शंकर तायडे, शुभम प्रल्हाद तायडे, रतिलाल संतोष सोनवणे, लिंबू राक्या चंद्रकांत सोनवणे, गणेश उर्फ बुच्या सुरेश सपकाळे, अजय शिरीष सोनवणे, मनोज सोनवणे व माजी नगरसेवक कांचन सोनवणे यांचे दिर (सर्व रा. वाल्मिक नगर) मयुर तायडे (रा. कांचन नगर) इतर १० ते १२ कार्यकर्ते.
तिसºया गुन्ह्यात रोहीत नरेंद्र कोळी, धीरज मंगल कोळी, गोलु जगन्नाथ कोळी (रा. वाल्मिक नगर), सम्राट मनी त्रिपाठी (रा.सुप्रीम कॉलनी), शिवपवन झंवर (रा.अयोध्या नगर), देवेश शेखर तिवारी (रा.चंदू आण्णा नगर), आकाश दशरथ डोळे (रा.हरिओम नगर), राहूल विनोद पासे (रा.काशिनाथ पाटील नगर), भूषण विलास सपकाळे (रा.तानाजी मालुसरे नगर), अतुल सखाराम पाटील (रा.मेस्कोमाता नगर) व शिवम पाटील (रा.मेस्को माता नगर) याच्यासह ८ ते १० कार्यकर्ते. जिल्हा पेठ पोलिसातही एक डि.जे.जप्त करण्यात आला आहे.
पोलीस झाले फिर्यादी
सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी मिरवणूक संपल्यानंतर डि.जे.जप्त केले. आयोजक, आॅपरेटर व चालक, मालक यांच्यावर गुन्हे दाखल केले. या तिन्ही गुन्ह्यात पोलीस फिर्यादी आहेत. पो.ना.गिरीष दिलीप पाटील, संदीप अशोक माने व सोमेश गरड यांनी फिर्याद दिली आहे. सर्व संशयितांना सीआरपीसी ४१(१) ची नोटीस बजावून समज देण्यात आली. दरम्यान, डि.जे.चे वाहन क्र.एम.एच.०४ बी.यु.२९८९, एम.एच.१५ सी.के.७३१२ व एम.एच.४३ ए.डी.१३७१ जप्त करण्यात आले आहे.

Web Title: kasamataepaekasaa-adhaika-daesaibalacae-daijaecaa-vaapara-kaelayaaparakaranai-ajai-maajai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.