कासोद्यात एकाच कुटुंबात ५ व्यक्ती कोरोना पाॅझीटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 05:18 PM2021-02-24T17:18:42+5:302021-02-24T17:20:13+5:30
एकाच कुटुंबात चार व्यक्ती कोरोना पाॅझिटीव्ह आल्याने घबराट पसरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कासोदा, ता. एरंडोल : येथील एका बॅंक कर्मचाऱ्यांला लक्षण दिसून लागल्याने त्याने स्वतःच कोरोना टेस्ट करवून घेतली असून तो पाॅझीटिव्ह निघाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र या प्रकारामुळे गावकऱ्यांची चिंता वाढली असून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु झाली आहे.
मंगळवारी गावात आठवडे बाजार रद्द करण्यात आला, मात्र जनतेला कोरोनाचे गांभीर्य नसल्याने बाजार भरलाच होता. नागरिक पण बाजारात गेलेच होते, मोठी गर्दी होती हे विशेष.
येथील श्रीकृष्ण नगरमधील एक व्यक्ती चाळीसगाव तालुक्यात एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्या कार्यक्रमातूनच ते कोरोना सोबत घेऊन आल्याची माहिती मिळाली आहे. त्या कार्यक्रमाला असणारे अनेक व्यक्तीदेखील पाॅझीटिव्ह निघाल्याची माहिती मिळाली आहे.परंतु या कर्मचाऱ्यांच्या घरात अजून ४जण पाॅझिटिव्ह निघाल्याने मोठी चिंता वाढली आहे. या परिसरातील अनेक लोकांची आज दि.२४रोजी कासोदा प्रा. आ. केद्रातील कर्मचाऱ्यांनी कॅम्प घेऊन तपासणी केली आली आहे. मात्र जे संभाव्य पाॅझीटीव्ह आलेले इतर ४ लोक आहेत, ते अनेक ठिकाणी जाऊन आल्याने त्यामुळे आणखी संसर्ग वाढतो का याबाबत चर्चा होत आहेत.
याबाबतच्या अधिक माहितीसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही.