बसेस फिट राहण्यासाठी, दर तीन दिवसआड केले जात आहे ‘सर्व्हिसिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:35+5:302021-06-03T04:12:35+5:30

बसेस फिट राहण्यासाठी, दर तीन दिवसआड केले जात आहे ‘सर्व्हिसिंग’ खबरदारी : बसेस जागेवर असल्या तरी किमान १५ मिनिटे ...

To keep the buses fit, ‘servicing’ is being done every three days. | बसेस फिट राहण्यासाठी, दर तीन दिवसआड केले जात आहे ‘सर्व्हिसिंग’

बसेस फिट राहण्यासाठी, दर तीन दिवसआड केले जात आहे ‘सर्व्हिसिंग’

Next

बसेस फिट राहण्यासाठी, दर तीन दिवसआड केले जात आहे ‘सर्व्हिसिंग’

खबरदारी : बसेस जागेवर असल्या तरी किमान १५ मिनिटे चालू ठेवले जाते इंजिन

जळगाव : कोरोनामुळे गेल्यावर्षी चार महिने बसेस जागेवरच उभ्या होत्या, तर आताही महिनाभराच्या लॉकडाऊनमध्ये या बसेस जागेवरच उभ्या होत्या. अशा वेळेस महामंडळातर्फे या बसेस सुस्थितीत राहण्यासाठी दर तीन दिवसआड प्रत्येक बसचे सर्व्हिसिंग केले जात आहे. तसेच इंजिन व बॅटरी सुस्थितीत राहण्यासाठी किमान पंधरा ते वीस मिनिटे बस चालू ठेवण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाच्या यांत्रिकी विभागातर्फे सांगण्यात आले.

प्रवाशांचा प्रवास सुखरूप आणि सुरक्षित करण्यासाठी महामंडळातर्फे बसेसची विशेष काळजी घेतली जाते. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारात महामंडळाच्या अद्ययावत कार्यशाळा आहेत. तसेच या ठिकाणी बसेसच्या देखभाल व दुरुस्तीसाठी सर्व प्रकारची अद्ययावत सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनामुळे प्रवासी सेवा बंद असल्याने सर्व बसेस यंदाही मे महिन्यात एक महिना जागेवरच उभ्या होत्या. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना सोडण्यासाठी फक्त आठ ते दहा बसेसचा वापर करण्यात येत होता, तर उर्वरित बसेस या जागेवरच उभ्या होत्या. मात्र, एकाच जागी उभ्या असलेल्या बसचा ''मेंटेनन्स'' बिघडला जाऊ नये, बसचे स्टेअरिंग, इंजिन, गियर बॉक्स आदी महत्त्वाच्या भागाला ''गंज'' चढू नये, यासाठी दर तीन दिवसआड बसेसची निगा राखली जात असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे बसेसच्या या देखभाल व दुरुस्तीसाठी महामंडळाच्या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून बसेसची निगा राखली जात असल्याचेही सांगण्यात आले.

इन्फो :

१) पंधरा मिनिटे बस सुरू ठेवणे

बसचा मुख्य भाग इंजिन असतो. त्यामुळे ते सुस्थितीत राहावे, यासाठी दर तीन दिवसआड बसचे सर्व्हिसिंग केले जात आहे. बसेस किमान पंधरा मिनिटे चालू ठेवून त्यांच्या मेंटेनन्सची पाहणी करण्यात येत आहे.

२) स्पेअरपार्ट तपासणे

बसेसना अनेक ठिकाणी लहान-मोठे स्पेअरपार्ट असल्याने, ते सुस्थितीत आहेत की नाही, याची तपासणी करणे, जर कुठे नट-बोर्ड खिळखिळा झाला असेल, तर तो बद्दलविणे, आदी कामे केली जात आहेत.

३) रखडलेली कामे लावली मार्गी

लॉकडाऊनमुळे बसेस आगारातच थांबून असल्याने कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांतर्फे ज्या बसेसचे मोठे तांत्रिक प्रॉब्लेम आहेत, ती कामे या वेळात मार्गी लावली. तसेच जुने साहित्य, दुरुस्ती करून तेदेखील वापरात आणून, महामंडळाचा आर्थिक खर्च वाचविण्याचा प्रयत्न केला.

इन्फो :

...तर करोडो रुपयांचे नुकसान टळले

कोरोनामुळे या बसेस जागेवरच उभ्या असल्याने या बसेसची निगा व त्यांचा योग्य तो मेंटेनन्स राखण्याबाबत महामंडळातर्फे प्रत्येक विभागाला सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जळगाव विभागाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करून, या बसेस आतापर्यंत सुस्थितीत ठेवल्या आहेत. जर याकडे दुर्लक्ष केले असते, तर या बसेस भंगारात जाऊन, महामंडळाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असते, असा अंदाज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी वर्तविला.

इन्फो :

यंदा फक्त चार महिने रस्त्यावर

यंदा एप्रिलपासून कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने, १५ एप्रिलपासूनच ९० टक्के सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर मे महिन्यातही ९० टक्के सेवा बंद होती. त्यामुळे चालू वर्षात फक्त साडेतीन महिनेच सेवा सुरू राहिली.

- सेवा बंद असल्यामुळे महामंडळाच्या एकट्या जळगाव विभागाचे १८ कोटींच्या घरात नुकसान झाले, तर गेल्यावर्षीही कोरोनामुळे बससेवा बंद असल्याने जळगाव विभागाचे ८० कोटींहून अधिक उत्पन्न बुडाले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेकवेळा कर्मचाऱ्यांना पगारासाठी तीन ते चार महिने वाट पाहावी लागली.

इन्फो :

लॉकडाऊनमुळे जागेवरच उभ्या असलेल्या बसेस सुस्थितीत राहाव्यात, यासाठी महामंडळाच्या सूचनेनुसार दर तीन दिवसआड या बसेसचा मेंटेनन्स बघत असतो, त्यांचे सर्व्हिसिंग करत असतो. बसेसची सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत असल्याने, जळगाव विभागातील १०० टक्के बसेस या केव्हाही रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज आहेत.

- भगवान जगनोर, विभाग नियंत्रक

इन्फो :

१) जिल्ह्यातील आगार : ११

२) एकूण बसेस ८००

Web Title: To keep the buses fit, ‘servicing’ is being done every three days.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.