चोऱ्यांना आळा घालण्यासाठी भंगारविक्रेत्यांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 06:38 PM2021-02-14T18:38:05+5:302021-02-14T18:38:13+5:30

पोलिसांनी संशयास्पद मालाबाबत सुरु केली चौकशी, मागितले पुरावे

Keep a close eye on scrap dealers to curb theft | चोऱ्यांना आळा घालण्यासाठी भंगारविक्रेत्यांवर करडी नजर

चोऱ्यांना आळा घालण्यासाठी भंगारविक्रेत्यांवर करडी नजर

Next


भुसावळ :  शहरामध्ये घरफोडी, चोरीसह भंगार चोरीचे  प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. यामुळे पोलीस प्रशासनातर्फे १३ भंगार  दुकानांवर छापे मारून संशयित मुद्देमाल ताब्यात घेतला घेतला होता. मात्र, त्या भंगारातील सामानाचे कागदपत्र दाखविले नसल्याने कागदपत्र न दाखविल्यास  नाही दाखविल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांतर्फे देण्यात आला आहे. 
शहरामध्ये  चोरीचे भंगार घेण्याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. चोरांनी भंगार दुकानदारांना महागड्या वस्तू कवडीमोल किमतीत विकल्या आहेत. यातूनच अनेक भंगार दुकानदार शेठ झालेले आहेत  व सफेद कांजी कपडे घालून समाजात वावरताना दिसतात.  
हाच धागा पकडून सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे       यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १३ भंगार व्यावसायिकांच्या गोदामाची अचानक झाडाझडती घेण्यात आली होती. 

Web Title: Keep a close eye on scrap dealers to curb theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.