Vidhan Sabha 2019 : १० लाखापेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर राहणार नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:17 AM2019-09-25T11:17:30+5:302019-09-25T11:18:32+5:30

उमेदवारांच्या बँक खात्यावर बारकाईने लक्ष

Keep an eye on transactions worth over Rs 1 lakh | Vidhan Sabha 2019 : १० लाखापेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर राहणार नजर

Vidhan Sabha 2019 : १० लाखापेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर राहणार नजर

Next

जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना २८ लाख रुपये खर्चाची मर्यादी ठरवून दिली असली तरी या काळात उमेदवाराच्या खात्यातून १० लाखापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार झाल्यास त्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, महाव्यवस्थापक, आयकर विभाग यांना कळवावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या मोठ्या व्यवहारावर प्रशासनाची करडी नजर राहणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिले.
‘निवडणूक काळात बँकांनी घ्यावयाची काळजी’ या विषयावर बँकांच्या प्रतिनिधीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झाली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल मलवाणी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा कोषागार अधिकारी प्र. सी. पंडित, जिल्हा उप निबंधक मेघराज राठोड, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख, निवडणूक तहसीलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार मोरे, कळसकर यांच्यासह भारतीय रिझर्व बँकेचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील राष्टीयकृत बँकांचे व्यवस्थापक व प्रतिनिधी उपस्थित होते.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा ठरवून दिली आहे. तथापी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेला छेद देण्यासाठी उमेदवारांकडून विविध क्लुप्त्या वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी राष्ट्रीयकृत बँका, शेड्यूल बँका, सहकारी बँका तसेच पतसंस्थांनी निवडणूक काळात भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणेच आर्थिक व्यवहार होतील, यावर विशेष लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले.
खाते तातडीने उघडा
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, निवडणुकी दरम्यान उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैशांव्यतिरिक्त वस्तू स्वरूपात अनेक प्रलोभने दाखवितात. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक लढविणाºया उमेदवारांनी निवडणुकीसाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक आहे. जे उमेदवार खाते उघडण्यासाठी येतील त्यांचे खाते तातडीने उघडून द्यावे. निवडणुकीसाठी घालून दिलेल्या २८ लाख रूपयांच्या मर्यादेपेक्षा अधिक खर्च होणार नाही यावर लक्ष ठेवावे. तसेच निवडणूक खर्चासाठी लागणाºया रकमा या १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास अशा रकमा या धनादेशाद्वारेच दिल्या जातील याची दक्षता घ्यावी.
मोठ्या रकमेच्या व्यवहारांची माहिती कळवा
बँकांनी उमेदवारांची खाती प्राध्यान्यक्रमाने उघडून घेवून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १० लाखापेक्षा जास्त रकमेच्या भरणा किंवा पैसे काढलेल्या व्यवहाराची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व महाव्यवस्थापक, आयकर विभाग यांच्या पत्यावर नोंदवावी. निवडणूक कालावधीत उमेदवारांव्यतिरिक्त ज्या खात्यावरुन वारंवार रकमा काढल्या जात असल्यास त्याचीही माहिती द्यावी. अशा खात्यावर बॅकेच्या अधिकाऱ्यांनी करडी नजर ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी संबंधितांना दिल्या. बँकांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करताना सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी उपस्थितांना दिल्यात. त्याचबरोबर ज्या बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांची निवडणूकीसाठी नियुक्ती करण्यात आली आह, त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

Web Title: Keep an eye on transactions worth over Rs 1 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.