मनाचा रिमोट कंट्रोल स्वत:च्या हातात ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 11:44 AM2020-03-09T11:44:31+5:302020-03-09T11:44:41+5:30

जळगाव : आपल्या मनाचे मालक आपण स्वत: असले पाहिजे, बाहेरची परिस्थिती व व्यक्तीमुळे मन डगमगता कामा नये, आपल्या मनाचा ...

Keep the remote control of the mind in your own hands | मनाचा रिमोट कंट्रोल स्वत:च्या हातात ठेवा

मनाचा रिमोट कंट्रोल स्वत:च्या हातात ठेवा

Next

जळगाव : आपल्या मनाचे मालक आपण स्वत: असले पाहिजे, बाहेरची परिस्थिती व व्यक्तीमुळे मन डगमगता कामा नये, आपल्या मनाचा रिमोट कंट्रोल हा आपल्याच हातात हवा, तेव्हा खरी मनाची शांती, सुख मिळेल, हाच खुशीचा पासवर्ड आहे...असा संदेश ब्रह्मकुमारी शिवानी दिदी यांनी रविवारी येथे दिला़
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय व आऱ ई़ आऱ एफ जळगावतर्फे रविवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आयोजित ‘खुशी का पासवर्ड’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी हजारो नागरिकांची उपस्थिती होती़ क्रीडा संकुल आणि गॅलरीही जवळपास पूर्ण भरलेली होती. बसायलाही जागा नव्हती, असे दृश्य पहायला मिळत ोते.
क्रीडा संकुल फुल्ल
शिवानी दिदी यांचा संदेश ऐकण्यासाठी हजारो नागरिकांनी उपस्थिती दिली. संपूर्ण क्रीडा संकुल गर्दीने फुल्ल झाले होते़ मोठ्या गर्दीतही चांगल्या नियोजनामुळे कुठेही कसलाही गोंधळ नव्हता़ नेटक्या नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम कोणताही गोेंधळ न होता, शांततेत पार पडला. शिवानी दिदींनी दिलेला संदेश ऐकण्यात भक्तगण तल्लीन होऊन गेले होते.
दरम्यान दीपप्रज्वलनाच्या वेळी उपस्थितांनी मोबाईलचा टॉर्च सुरू करून प्रतिसाद दिल्याने हजारो छोटे दिवे लखलखताना दिसत होते़ हा प्रसंग यावेळी अधिक लक्षवेधी ठरला़ शिवानी दिदींचे विचार ऐकण्यासाठी केवळ जळगाव शहरातूनच नव्हे तर तालुका अन् जिल्हाभरातून भक्तगण आले होते.
कार्यक्रमात मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले़ यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, शाकाहार सदाचारचे प्रणेते आऱ सी़ बाफना, प्र-कुलगुरू पी़ पी़ माहुलीकर, आमदार सुरेश भोळे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक सुनील मगरीवाल, क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, आॅर्डनन्स फॅक्टरीचे वसंत निमजित, माजी आमदार गुरूमुख जगवाणी, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, माजी महापौर सीमा भोळे, माऊंट अबू येथील ज्योगी आनंद, राजू भाई आदी उपस्थित होते़ राजयोगीनी मिनाक्षी यांनी स्वागत केले़ यानंतर शिवानी दिदी यांनी हजारोंच्या जनसमुदायास संबोधित करीत विचार मांडले़ शिवानी दिदींच्या प्रत्येक वाक्य भक्तगण तल्लीन होऊन ऐकत होते. त्याचबरोबर काही वाक्यांना टाळ्या वाजवूनही दाद देत होते.
संस्कार काय सांगतात?
यावेळी शिवानीदिदींनी संस्कारांबद्दल माहिती दिली. आत्मा व त्याचे संस्कार आपल्याला प्रभावित करीत असतात त्यात पूर्वजन्माचे, पालकांकडून मिळालेले, वातावरणाच्या प्रभावातून मिळणारे, इच्छाशक्तीतून आलेले हे चार संस्कार हे वरच्यावर असतात. मात्र, सर्व आत्म्यामध्ये असलेले अस्सल संस्कार हे सर्वांमध्ये सारखे असतात ते म्हणजे पवित्रता, शांती, प्रेम, शक्ती, सुख, ज्ञान, आनंद या सर्व गोष्टी आपल्या आत असतात व आपण त्या इतरांमध्ये, बाहेरच्या परिस्थितीत शोधतो़ नकारात्मक बाबींचा वारंवार उल्लेख करून आपण त्या वाढवतो, नेहमी सकारात्मकतेने आपण त्यावर मात करू शकतो़ दुसरे आपल्यासारखे वागत नाही म्हणून आपण दु:खी होते़ यामागचे कारण म्हणजे आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवतो, अपेक्षा हेच मुळ दु:खाचे कारण आहे़ दुसºयावर अवलंबून राहण्याने आपण आपल्यातील स्वत्वाला विसरून बसतो. आपण आपल्यातील क्षमतेला गमावून बसतो. त्यामुळे अपेक्षा न ठेवता जे आहे ते स्वीकारा. त्यानुसार आपले आचरण ठेवा. जगण्याची इच्छाशक्ती गमावू नका तर आहे ते सत्य स्विकारून मनात होकारार्थी विचार निर्माण करा, असा संदेश शिवानी दिदी यांनी यावेळी दिला.

हे आहेत ‘खुशीचे पासवर्ड’
-शांती, सुख, संस्कार आपल्या आत आहेत, त्या बाहेर शोधू नका.
-आपल्या मनावर आपलेच नियंत्रण हवे, दुसऱ्यांचे नको.
-आपण दुसºयांना बदलवू शकत नाही, स्वत:चे विचार आणि स्वत:ला बदला.
-बाहेरच्या परिस्थिती व व्यक्तीवर आपले सुख, शांती, अवलंबून ठेवू नका, हे एखाद्या गुलामासारखे आहे.
-चिंता करुनको... निश्चिंत रहा
- कशावरही अवलंबून राहू नका. ४पाहिजे, पाहिजे हे शब्द आपल्याला गुलाम बनवतात, जे आपल्यात आहे ते हवे कशाला, ते आचरणात आणा.
-आपल्या वाईट सवयी या केवळ वरवरच्या आहेत तो एक डाग आहे तो धुवून स्वच्छ करता येईल, त्याचा बाऊ करू नका.
-सकाळी दोन मिनिटे मन शांत करून परमात्याशी संवाद साधा तुम्हाला सर्व उत्तरे मिळतील.
-अपेक्षा नको स्वीकारण्याची वृत्ती ठेवा.

 

Web Title: Keep the remote control of the mind in your own hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.