केकतनिंभोरा येथे वीज वाहिनी पडल्याने केळी बाग खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2017 04:01 PM2017-04-19T16:01:36+5:302017-04-19T16:01:36+5:30

शेतातून गेलेली वीज वाहिनी तुटून पडल्याने लागलेल्या आगीत केळी बागासह ठिबक सिंचनचे साहित्य बुधवारी जळून खाक झाले.

Keli Bagh Khak due to electricity channel collapsing at Kekantanbhora | केकतनिंभोरा येथे वीज वाहिनी पडल्याने केळी बाग खाक

केकतनिंभोरा येथे वीज वाहिनी पडल्याने केळी बाग खाक

googlenewsNext

 जळगाव,दि.19- जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा येथील अमोल दत्तात्रय पाटील यांच्या शेतातून गेलेली वीज वाहिनी तुटून पडल्याने लागलेल्या आगीत केळी बागासह ठिबक सिंचनचे साहित्य बुधवारी जळून खाक झाले.

पाटील यांच्या मालकीच्या गट नं.119/2 ब या शेतातील तीन हजार केळीची लागवड केली होती. तसेच त्यासाठी ठिबक सिंचनची व्यवस्था लावण्यात आली होती. आगीत हे साहित्य जळून सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे हे नुकसान झाले असून तत्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतक:याने केली आहे.

Web Title: Keli Bagh Khak due to electricity channel collapsing at Kekantanbhora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.