भडगावात १९ जानेवारीपासून ‘केशवसूत ज्ञानप्रबोधिनी व्याख्यानमाला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 04:27 PM2019-01-18T16:27:26+5:302019-01-18T16:28:36+5:30

गेल्या २३ वर्षांपासून अखंडपणे सुरू असणारी व उत्तर महाराष्ट्रात मानदंड ठरलेल्या भडगाव येथील केशवसूत ज्ञानप्रबोधिनी व्याख्यानमालेला १९ जानेवारीपासून सुरूवात होत आहे.

'Keshavsut GyanPrabhini Vidyakamala' from January 19, in Bhadgam | भडगावात १९ जानेवारीपासून ‘केशवसूत ज्ञानप्रबोधिनी व्याख्यानमाला’

भडगावात १९ जानेवारीपासून ‘केशवसूत ज्ञानप्रबोधिनी व्याख्यानमाला’

Next
ठळक मुद्देनागरिकांना मिळणार विविध व्याख्यानांची मेजवानीज्ञान, प्रबोधन व मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारित या व्याख्यानमालेत नामवंत वक्त्यांंची व्याख्यान१९ ते २३ जानेवारीपर्यंत रंगणार साहित्यिक मेजवानी

भडगाव, जि.जळगाव : गेल्या २३ वर्षांपासून अखंडपणे सुरू असणारी व उत्तर महाराष्ट्रात मानदंड ठरलेल्या भडगाव येथील केशवसूत ज्ञानप्रबोधिनी व्याख्यानमालेला १९ जानेवारीपासून सुरूवात होत आहे.
ज्ञान, प्रबोधन व मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारित या व्याख्यानमालेत आजपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांंची व्याख्याने झाली आहेत. यानिमित्ताने ‘केशवसूूत ज्ञानप्रबोधिनी’ने चांगली साहित्यिक परंपरा जोपासली आहे.
व्याख्यानमालेत १९ जानेवारी रोजी डॉ.जगन्नाथ दीक्षित (लातूर) यांचे ‘विनासायास वेटलॉस व मधुमेह नियंत्रण’ या विषयावर व्याख्यान होईल. २० रोजी ‘वर्तमान सामाजिक समस्या आणि आपली संस्कृती’ या विषयावर प्रा.डॉ.साहेबराव खंदारे (परभणी) यांचे व्याख्यान होईल.
२१ रोजी रघुनाथ मेदगे (मुंबई) हे ‘मुंबईचे डबेवाले : व्यवस्थापन गुरू’ या विषयावर बोलतील. २२ रोजी अशोक देशमुख (पुणे) यांचे ‘हसत खेळत तणावमुक्ती’ या विनोदी विषयावर होईल, तर २३ जानेवारीला श्रेयस बडवे व मानसी बडवे (पुणे) यांच्या ‘कीर्तन जुगलबंदी’ने व्याख्यानमालेचा समारोप होईल.
शेतकरी सहकारी संघाच्या प्रांगणावर दररोज रात्री ८.३० वा व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. केशवसूत ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष विजयराव देशपांडे, उपाध्यक्ष डॉ.विलासराव देशमुख, सचिव प्रा.दीपक मराठे व पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: 'Keshavsut GyanPrabhini Vidyakamala' from January 19, in Bhadgam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.