कुºहे पानाचे येथील एटीएम चोरट्यांनी फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 06:02 PM2019-07-22T18:02:31+5:302019-07-22T18:02:56+5:30
कुºहे पानाचे येथील एटीएम चोरट्यांनी फोडले
xभुसावळ : तालुक्यातील कुºहे ( पानाचे ) येथील रा. धों . माध्यमिक विद्यालयाच्या दुकान संकुलातील आयडीबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री २.३० ते चार वाजेच्या दरम्यान फोडून त्यातील ६ लाख ४१ हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली विशेष म्हणजे रात्री दोन वाजेपर्यंत या परिसरात पोलिसांची गस्त सुरू होती . तरीही हा प्रकार घडल्याने चोरट्यांनी पोलीस प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे केले आहे.
प्राप्त माहिती अशी की, सोमवारी सकाळी अडीच ते चार वाजेच्या दरम्यान हे रोरटे या ठिंकाणी आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात बँकेचे व्यवस्थापक विमल प्रधान यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. रावेर तालुक्यातील निंबोल येथील बँक दरोडा प्रकरणातील तपास अद्याप लागला नसताना हे एटीएम फोडण्यात आल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
गर्दीच्या ठिकाणी एटीएम
कुºहे ( पानाचे ) येथील बस स्थानकाजवळ रा. धों . माध्यमिक विद्यालयाच्या दुकान संकुलामध्ये आयडीबीआय बँकेचे हे एटीएम आहे . तर बस स्थानकावर दुसरे एका बँकेचे एटीएम आहे. त्याच प्रमाणे या परिसरातच जिल्हा मध्यवर्ती बँक , आयडीबीआय बँक, बुलढाणा अर्बन बँक, या तीन बँका जवळजवळ आहेत. मात्र चोरट्यांनी हेरून आयडीबीआय बँकेच्या एटीएमवर डल्ला मारला आहे. एटीएम मध्ये दोन-तीन दिवसांपूर्वीच नऊ लाख ४७ हजार रुपये बॅँक अधिकाऱ्यांनी टाकले होते, अशी माहिती बँक व्यवस्थापक प्रधान यांनी दिली तर एटीएम फोडण्यात आल्यानंतर एटीएम मध्ये बारा हजार रुपये आढळून आले. पाचशे रुपयाच्या २४ नोटा ह्या दोन हजार रुपयांच्या गाल्यामध्ये ( बॉक्समधे ) आढळून आल्या. तर सहा लाख ४१ हजारांची अन्य रोकड लांबविल्याचे दिसून आले.
कॅमेरे फोडले
चोररट्यांनी एटीएममध्ये आल्यावर अगोदर दोन्ही सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आहे. गॅस कटरने एटीएम चा पुढील भाग पुर्ण कापून काढला आहे. त्यानंतर त्यांनी गॅस कटर , दोन सिलेंडर व एक लोखंडी पहार जागेवरच सोडून पोबारा केला असल्याचे दिसून आले.
पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली धाव
सकाळी सात वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार , उपनिरीक्षक गजानन करेवाड ,पो . कॉ . राजेंद्र पवार उमेश बारी , अजय माळी, विजय पोहेकर , प्रेमचंद सपकाळे, युनूस शेख यांच्यासह सहकाºयांना एटीएम फोडल्याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर मुक्ताईनगर विभागाचे डीवायएसपी संजय देशमुख , गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बापू रोहन,, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब ठोंबे, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक देविदास पवार , शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कोळी आदीना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले.
श्वानपथक जागेवरच घुटमळले
दरम्यान , घटनास्थळी ' चंप ' नावाच दोन वर्षीय शॉन पाचारण करण्यात आला. त्याने प्रथम पथक प्रमुख विनोद चव्हाण व शेषराव राठोड यांना चोरट्यांचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला . जवळच्या मार्गावर गेल्यावर हा श्वान जागेवरच घुटमळत राहीला. यावरून चोरटे हे घटनास्थळावरून चारचाकी वाहनाने पसार झाले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसेच तसेच ठसे तज्ज्ञांनीही ठसे घेतले असून या घटनेचा कसून शोध सुरू आहे.