मुक्ताईनगर येथील खडसे आश्रमशाळा गैरव्यवहारातील आरोपीस अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:59 AM2018-06-26T11:59:25+5:302018-06-26T12:00:30+5:30

माजी कर्मचाऱ्याची मागणी

Khadse Ashramshala arrested in Muktainagar arrest of accused | मुक्ताईनगर येथील खडसे आश्रमशाळा गैरव्यवहारातील आरोपीस अटक करा

मुक्ताईनगर येथील खडसे आश्रमशाळा गैरव्यवहारातील आरोपीस अटक करा

Next
ठळक मुद्देराजकीय दबावापुढे पोलीस हतबलखडसेंना वेगळा न्याय व मला वेगळा न्याय

जळगाव : मुक्ताईनगर येथील गणपतराव खडसे अनुदानित आश्रम शाळेतील गैरव्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीला तत्काळ अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करावे अशी मागणी या शाळेतील माजी कर्मचारी नरेंद्र तायडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजता जळगाव शहरातील बळीराम पेठेतील ओक मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.
गणपतराव खडसे अनुदानित आश्रम शाळेतील संशयित आरोपी व मुख्याध्यापक राजेश पाटील यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय अनुदानात एक लाख ७५ हजार ३६४ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचे सिद्ध झाल्याचा दावा त्यांनी केला. राजकीय दबावामुळे हा गुन्हा दाखल न झाल्याने २ डिसेंबर २०१५ रोजी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात कलम १५६ (३) नुसार गुन्हा दाखल आहे. तसेच आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी या आश्रमशाळेतील मुख्याध्यापकास अफरातफर केल्याप्रकरणी दोषी ठरविले आहे. मात्र माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यामुळे मुक्ताईनगर प्रशासनाने तब्बल १७ महिने उलटलनंतरही आरोपीस अटक केलेली नाही. या प्रकरणात दोषारोपपत्र देखील दाखल केलेले नाही.
या प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी निलोत्पल यांच्याकडे वर्ग करण्यात आला. मात्र त्यांनी आरोपीस अटक करण्याऐवजी भुसावळ कोर्टात रिव्हीजन अपील दाखल करीत या प्रकरणात स्थगिती मिळवून घेतल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस प्रशासन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या दबावापोटी आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस प्रशासन राजकीय दबावापोटी कारवाई करीत नसेल तर माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने न्यायाची अपेक्षा कुणाकडून करावी असा सवालही त्यांनी केला.
खडसेंना वेगळा न्याय व मला वेगळा न्याय
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व अन्य ५ जणांविरूद्ध मुक्ताईनगर न्यायालयात खटला दाखल केला. या प्रकरणी १२ जून रोजी गुन्हा दाखल झाला. आठ दिवसात पोलिसांनी या प्रकरणातील काही जणांना अटक केली. मात्र खडसे आश्रम शाळेतील भ्रष्टाचार प्रकरणात १७ महिन्यानंतरही कारवाई झालेली नाही. त्यामुळे खडसे यांना वेगळा व मला वेगळा न्याय असे का? असा सवाल त्यांनी केला.

Web Title: Khadse Ashramshala arrested in Muktainagar arrest of accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.