खडसे-गुलाबराव यांच्या बदनामीच्या दाव्यात मध्यस्थीसाठी सुरुवात
By admin | Published: April 18, 2017 11:03 AM2017-04-18T11:03:59+5:302017-04-18T11:03:59+5:30
राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दाखल केलेल्या 5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईच्या दिवाणी दाव्यात मध्यस्थीसाठी न्यायालयाने सोमवारी सुरुवात केली
Next
जळगाव,दि.18-बदनामी केल्याप्रकरणी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या 5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईच्या दिवाणी दाव्यात मध्यस्थी (मेडिएशन) करण्यासाठी न्यायालयाने नियमानुसार सोमवारी प्रकरणाला सुरुवात केली. त्यावर गुलाबराव व खडसे या दोघांना 29 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मुक्ताई साखर साखर कारखान्याची दीडशे कोटी रुपये, पॉलीहाऊसचे अनुदान यासह विविध प्रकारचे अनुदान एकनाथराव खडसे यांनी लाटल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला होता. हे आरोप खोटे असल्याचे सांगून खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द 1 जानेवारी 2016 रोजी दिवाणी न्यायालयात 5 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. न्या.निर्लेगकर यांच्या न्यायालयात हे प्रकरण आहे. सोमवारी न्यायालयाने (मेडिएशन) मध्यस्थीसाठी एकनाथराव खडसे व गुलाबराव पाटील यांना 29 एप्रिल रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.