खडसे समर्थकांतर्फे भुसावळ ग्रामीण रुग्णालयात औषधी सामग्रीची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 02:34 PM2021-05-13T14:34:32+5:302021-05-13T14:37:06+5:30
माजी मंत्री खडसे समर्थकांनी भुसावळ ग्रामीण रुग्णालयात औषधी सामग्रीची मदत केली.
भुसावळ : सध्या अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. भुसावळ तालुक्यातील रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालय जणू संजीवनीच आहे. येथे रुग्णांना योग्य उपचार मिळत आहेत, परंतु प्रशासकीय बाबींमुळे रुग्णांना लागणारी काही औषधे व व इतर सामग्री वेळेवर उपलब्ध होत नसल्याने महामार्गावरील साकेगाव लगत असलेल्या ग्रामीण रुग्णालयात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांनी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी मदत म्हणून पीपझो इंजेक्शन ५० नग, मेरोपेनेम इंजेक्शन्स ५० नग, एन ९५ मास्क २०० नग, पिलो कव्हरसह ७० नगर, सॅनिटायझर ६० लीटर, ऑक्सी मीटर १० नग, थर्मामीटर गन दोन नग असे अंदाजे दोन लाख रुपयांचे साहित्य नगराध्यक्ष रमण भोळे, प्रासुनील नेवे, उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, वसंत पाटील, दिनेश नेमाडे, देवा वाणी, किरण कोलते, मुकेशपाटील, मुकेश गुंजाळ, संदेश सुरवाडे, राजकुमार खरात, बोधराज चौधरी, बापू महाजन, किशोर पाटील, अमोल इंगळे, प्रशांत अहिरे, मुन्नातेली, शफी पहेलवान, प्रमोद पाटील, अनिकेत पाटील आदींनी सहभागातून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते मदत म्हणून दिल्या.
याप्रसंगी खडसे यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगतात त्यांनी सांगितले की, ट्रामा सेंटर मी मंत्री असताना पाठपुरावा करून मदत केली व या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या आकृती बंधास मदत केली. आज या रुग्णालयाचा होणारा फायदा बघून समाधान वाटते, रुग्णालयात सुरू केलेल्या ऑक्सिजन प्रकल्पामुळे तेथे ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. सरकार आपल्या परीने भरपूर मदत कार्य करत आहे परंतु ही महामारी असल्याने सरकार प्रत्येक ठिकाणापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा काही प्रशासकीय बाबीमुळे सामग्री उपलब्ध होऊ शकत नाही म्हणून प्रत्येकाने शक्य ती मदत करायलाच हवी. भुसावळातील नगरसेवकांनी दिलेली ही मदत नक्कीच रुग्णांना दिलासा देईल. आगामी काळातही असेच मदतकार्य करत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
लसीकरणासंदर्भातही खडसेंनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधला व जिल्ह्यासाठी वेळेवर जास्तीच्या लस उपलब्ध करून देण्याबद्दल विनंती केली.
याप्रसंगी दीपनगर केंद्राचे माजी अधिकारी राजेंद्र बाविस्कर, रमेश मकासरे, डॉ.मयुर चौधरी, डॉ.चाकूरकर, रुग्णालयातील स्टॉफ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.