खानापूर मंडळ, संगणकीकृत उतारा १४ गटांची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:13 AM2021-06-28T04:13:10+5:302021-06-28T04:13:10+5:30
रावेर : तालुक्यातील खानापूर महसूल भाग मंडळातील २३ गावातील शेतकऱ्यांनी ७/१२ संगणकीकृत उतारा दुरुस्ती शिबिरात १४ शेतगटांची ७/१२ ...
रावेर : तालुक्यातील खानापूर महसूल भाग मंडळातील २३ गावातील शेतकऱ्यांनी ७/१२ संगणकीकृत उतारा दुरुस्ती शिबिरात १४ शेतगटांची ७/१२ उताऱ्यांची दुरुस्ती करून तीन सातबारा उताऱ्यातील चुकांची दुरुस्ती तहसीलदारांच्या अखत्यारीत असल्याने ते दुरुस्तीसाठी वर्ग करण्यात आले आहेत.
खानापूर महसूल भाग मंडळातील खानापूर, निरुळ, पाडळे बु, पाडळे खुर्द अहिरवाडी, मोहगण, पिंप्री, केऱ्हाळे बु, केऱ्हाळे खुर्द, मंगरुळ, जुनोने, भोकरी, कर्जोद, वाघोड, मोरगाव बु, मोरगाव खुर्द, बोरखेडा, तामसवाडी, अटवाडे, अजनाड, चोरवड, दोधे, नेहता या गावातील शेतकऱ्यांनी संगणकीकृत ७/१२ उताऱ्यातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी खानापूर महसूल मंडळाधिकारी यांच्या कार्यालयात २६ जून रोजी आयोजित केलेल्या संगणकीकृत ७/१२ उतारा दुरुस्ती शिबिराचे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. खानापूर महसूल भाग मंडळाधिकारी विठोबा पाटील यांनी त्यांचे स्वागत केले .
दरम्यान, प्रास्ताविकात मंडळाधिकारी विठोबा पाटील यांनी, संगणकीकृत ७ /१२ उताऱ्यातील १५५ अंतर्गत दुरुस्ती करणे, संगणकीकृत व हस्तलिखित ७/१२ वाचन करून दुरुस्त करणे, फेरफार नोंदीसाठी अर्ज स्वीकारणे, फेरफार प्रमाणीकरणाचे निर्गमन करणे, संगणकीकृत अहवाल सादर करणे अशा दुरुस्तीचा समावेश असल्याचे स्पष्ट केले.