खान्देश पानासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:17 AM2021-05-09T04:17:05+5:302021-05-09T04:17:05+5:30
जळगाव : पाळधी ते खोटेनगर या दरम्यानचा रस्त्यात गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले होते. तेथे अनेक लहानमोठे ...
जळगाव : पाळधी ते खोटेनगर या दरम्यानचा रस्त्यात गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले होते. तेथे अनेक लहानमोठे अपघात देखील झाले आहेत. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यात बांभोरी पूल, त्यानंतर पुलापासून पुढे खोटेनगरपर्यंत साईडपट्ट्यांचा भराव करणे, तसेच इतर कामांना वेगाने सुरुवात करण्यात आली आहे.
नदीपात्रात भरली जत्रा
जळगाव : सावखेडा गावाच्या हद्दीत येणाऱ्या नदीपात्रात असलेल्या वाळू गटात दररोज सकाळी वाळू उचलण्यासाठी जणू जत्राच भरते. या ठेक्यातून वाळू उचलण्याची परवानगी असली तरी तेथे अनेक ट्रॅक्टर आणि शेकडो मजुर काम करतात. तेथे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे.
जळगावातील नालेसफाई करा
जळगाव : आता पावसाळा अवघ्या महिनाभरावर आला आहे. या काळात मनपाने शहरातील नाल्यांची सफाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यातच प्रोफेसर कॉलनी, गणेश कॉलनीतून पुढे बजरंग बोगद्याकडे जाणाऱ्या नाल्याची सफाई प्राधान्याने करण्यात यावी, अशी मागणी परिसरात राहणारे नागरिक करत आहेत.