कंडारीत बालकाला विहिरीत फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:18 PM2019-12-02T12:18:08+5:302019-12-02T12:18:39+5:30
घटना : दैव बलवत्तर म्हणून बचावला बालक ; संशयिताला अटक, कारागृहात रवानगी
नशिराबाद : गल्लीत खेळत असलेल्या उज्ज्वल गजानन महाजन (वय २) या बालकाला काही कारण नसताना एकाने तरुणाने उचलून विहिरीत फेकले, मात्र दैव बलवत्तर म्हणूनच की काय या बालकाला कसलीही इजा झाली नाही. मृत्यूच्या दाढेतून हा बालक बाहेर आला आहे. कंडारी, ता.जळगाव येथे शनिवारी ही घटना उघडकीस आली.
दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर संशयित शिवाजी विश्वास पाटील (३०) या तरुणाविरुध्द नशिराबाद पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली.
पोलीस सूत्रांनी सांगितले असे की, कंडारी गावातील महाजन वाड्यात २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता उज्ज्वल गजानन महाजन गल्लीत खेळत असताना नात्यातीलच शिवाजी विश्वास महाजन याने काही एक कारण नसताना उज्ज्वल यास उचलून जीवे काशिनाथ महाजन यांच्या घराच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक विहिरीमध्ये उचलून टाकले. नागरिकांनी लागलीच धाव घेतल्यामुळे बालक बचावला.
संशयित व बालक जवळचे नातेवाईक असल्याने त्यांनी उशिरा पोलिसात धाव घेतली. शनिवारी याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी शिवाजी महाजन यास अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली सुनावली आहे. दरम्यान भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे ,पोलीस प्रवीण ढाके, राजेंद्र साळुंखे, व सहकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.