चिकनचे दुकान दाखवायच्या नावाने दोन चिमुकल्यांना पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:14 AM2021-05-30T04:14:39+5:302021-05-30T04:14:39+5:30

फोटो जळगावः चिकनचे दुकान कुठे आहे, मला दाखव या बहाण्याने एका तरुणाने गोपाळपुरा येथून दोन चिमुकल्यांना पळविल्याचा प्रकार उघडकीस ...

Kidnapped two chimpanzees in the name of showing the chicken shop | चिकनचे दुकान दाखवायच्या नावाने दोन चिमुकल्यांना पळविले

चिकनचे दुकान दाखवायच्या नावाने दोन चिमुकल्यांना पळविले

googlenewsNext

फोटो

जळगावः चिकनचे दुकान कुठे आहे, मला दाखव या बहाण्याने एका तरुणाने गोपाळपुरा येथून दोन चिमुकल्यांना पळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी सायंकाळी सुनील पडत्या बारेला रा. चिरमलीया जि.बडवानी, मध्यप्रदेश याच्या विरोधात शनी पेठ पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही चिमुकल्यांना घेऊन जाताना बारेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील शेलदा,ता. भिकनगाव जि.खरगोन राजू दत्तू चव्हाण हे पत्नी राणी, मुलगी काजल (१०), नंदीनी (७) व मुलगा प्रवीण (३) असे रोजगार निमित्ताने शहरातील गोपाळपुरा येथे वास्तव्यास आहेत.

त्यांच्या ओळखीतील सुनील पडत्या बारेला हा तरुण २७ मे रोजी जळगावात आला. यादरम्यान सुनील बारेला हा गोपाळपूरा येथे चव्हाण यांच्या घरी आला. दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याने मुलगी काजल हिला चिकनचे दुकान कुठे आहे मला दाखव असे म्हणत सोबत घेऊन गेला.त्यावेळी शेजारी राहणारा मयुर रवींद्र बुनकर (९) हा देखील त्यांच्यासोबत गेला. यानंतर सुनील हा परतलाच नाही. तसेच त्याच्यासोबत घेवून गेलेली दोन्ही बालकेही आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेतल्यानंतर दोन्ही मुले मिळून न आल्याने शनिवारी रात्री राणी राजू चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सुनील बारेला याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

एलसीबीने मिळविले फुटेज

दरम्यान, या गंभीर प्रकाराची माहिती मिळाल्यावर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी गोपाळपुरा गाठत कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली. एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, प्रितम पाटील व नितीन बाविस्कर यांनी काही प्रमुख मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका ठिकाणी बारेला दोघं मुलांसह कैद झाला आहे. त्यामुळे मुलांना त्यानेच पळविल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एक पथक तपासासाठी रवाना झाले आहे.

Web Title: Kidnapped two chimpanzees in the name of showing the chicken shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.