विद्यार्थ्याचा अपहरणाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 09:33 PM2019-11-16T21:33:14+5:302019-11-16T21:33:24+5:30

जळगाव - वडीलांना फोन करण्यासाठी मोबाईल मागणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्याला मारहाण करून दोघांनी अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी ...

 Kidnapping attempt of student | विद्यार्थ्याचा अपहरणाचा प्रयत्न

विद्यार्थ्याचा अपहरणाचा प्रयत्न

Next

जळगाव- वडीलांना फोन करण्यासाठी मोबाईल मागणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्याला मारहाण करून दोघांनी अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली आली आहे़ दरम्यान, प्रसंगावधान राखवत विद्यार्थ्याने गुजराल पेट्रोलपंप परिसरात दुचाकीवरून उडी घेत स्वत:ची सुटका करून घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला़ याबाबत पालकांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे़

शहरातील ओरियन सीबीएसई स्कूलच्या इयत्ता सहावीच्या वर्गात योजीत रामेश्वर चव्हाण हा विद्यार्थी शिक्षण घेत आहे़ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक डॉ़ आऱआऱ चव्हाण यांचा तो पुत्र आहे़ दरम्यान, बुधवारी सकाळी योजीत हा स्कूल व्हॅनने शाळेत आला़ मात्र, शाळेचा गणवेश घातलेला नसल्यामुळे दुपारी १२़२५ वाजेच्या सुमारास शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला व गणवेश आणण्यासाठी वडीलांना फोन करण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीजळव मोबाईल मागितला़ परंतू, त्या व्यक्तीने त्यास बाजूला घेऊन जात मारहाण केली व दुचाकीवर असलेल्या दुसºया साथीदाराला बोलवून योजीत याचे हाताने तोंड दाबून अपहरण करण्याचा प्रयत्न केला़

दुचाकीवरून घेतली उडी
अपहरणकर्ते दुचाकीवरून योजीत याला घेऊन जात असताना गुजराल पेट्रोल पंपाजवळ दुचाकी हळू झाली़ ही संधी ्रपाहत योजीतने दुचाकीवरून उडी घेतली़ यात त्याच्या पायाला दुखापत झाली़ नंतर त्याने जवळच असलेल्या मेडीकल स्टोअर्सवरून वडील प्रा़ डॉ़ आऱआऱ चव्हाण यांना फोन केला़ व त्यांना बोलवून संपूर्ण हकीकत सांगितली़ हा प्रकार त्यांनी त्वरित शाळा व पोलिसांना कळविला़ तसेच पोलिसात तक्रार दाखल केली़

पालकांकडून घटनेची माहिती मिळाली असून त्यांना पोलिसात तक्रार देण्याचे सूचविल्यानंतर त्यांनी तक्रार दिली आहे़ सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहे़ तर सुरक्षारक्षकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़
- सुषमा कंची, मुख्याध्यापिका, ओरियन सीबीएसई स्कूल

 

Web Title:  Kidnapping attempt of student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.