मुलाच्या अपहरणाचा बनाव आला बापाच्या अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 10:50 PM2019-04-16T22:50:10+5:302019-04-16T22:51:41+5:30

मुलाच्या अपहरणाचा बनाव बापाच्या अंगलट आला असून, सरपंचाशी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी बापाने खोटी फिर्याद दिल्याचे पोलीस तपासात आढळले आहे. ही घटना सार्वे, ता.पाचोरा येथील आहे.

The kidnapping of the child comes to the forearm | मुलाच्या अपहरणाचा बनाव आला बापाच्या अंगलट

मुलाच्या अपहरणाचा बनाव आला बापाच्या अंगलट

googlenewsNext
ठळक मुद्देपाचोरा तालुक्यातील सार्वे येथील प्रकारभांडणाचा वचपा काढण्यासाठी खोटी तक्रार

भडगाव, जि.जळगाव : मुलाच्या अपहरणाचा बनाव बापाच्या अंगलट आला असून, सरपंचाशी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी बापाने खोटी फिर्याद दिल्याचे पोलीस तपासात आढळले आहे. ही घटना सार्वे, ता.पाचोरा येथील आहे.
सूत्रांनुसार, ६ रोजी मुलगा गणेशचे अपहरण झाल्याची तक्रार ८ रोजी मुलाचे वडील विजय आधार पाटील यांनी दाखल केली होती. मात्र विजय पाटील यांनी मुलाला कपडे घेण्यासाठी कजगावला एकटे बसविले होते. नंतर शोधाशोध केली असता मुलाचा तपास लागला नाही, अशी तक्रार पोलीस स्टेशनला मुलाचे वडील विजय पाटील रा.सार्वे यांनी दिली होती. दरम्यान, ही तक्रार देण्याआधी विजय पाटील यांनी मुलाला स्वत: वाडी, ता.शिरपूर येथील मित्र सतीश शांताराम दुध्येकर यांच्याकडे सोडले. यानंतर गावातील सरपंचाशी झालेल्या भांडणात त्यांना या प्रकरणात कसे अडकवायचे असे विचार विजयच्या डोक्यात सुरू होते. याबाबत आरोपी विजयची पत्नी, आई, चुलता यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले असता ही बाब लक्षात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. यानंतर पोलीस पथक शिरपूर येथे गेले व मुलाला घेऊन भडगाव पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मुलाला आई मनीषाबार्इंच्या ताब्यात दिले. मुलाचे अपहरणाचा हा बनाव स्वत: बापानेच केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहीती पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी दिली याबाबत १५ रोजी विजय आधार पाटीलविरुद्ध कलम ३६५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, विजय पाटील यास पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: The kidnapping of the child comes to the forearm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.