जळगावातील ओरिआॅन स्कूलची किमया चौधरी चमकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:46 PM2018-05-29T22:46:41+5:302018-05-29T22:46:41+5:30

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला.

Kimaya Chaudhary of Oriya School of Jalgaon shines | जळगावातील ओरिआॅन स्कूलची किमया चौधरी चमकली

जळगावातील ओरिआॅन स्कूलची किमया चौधरी चमकली

Next
ठळक मुद्देसीबीएसई दहावी निकाल‘ओरिआॅन’ स्कूलचा आशीष पाटीलचे यशशहर व परिसरातील आठही शाळांचा निकाल १०० टक्के

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२९ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये केसीई सोसायटी संचलित ओरिआॅन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलची किमया हर्षल चौधरी ही ९८.४० टक्के गुण मिळवून तर आशीष सुनील पाटील या विद्यार्थ्याने ९८ टक्के गुण मिळवित यश मिळविले. शहर व परिसरातील आठही शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकालाची सर्वच विद्यार्थ्यांना उत्सुकता होती. मंगळवारी निकाल जाहीर होणार असल्याचे समजल्यानंतर सकाळपासूनच सर्व जणांना संकेतस्थळावर निकाल लागण्याची प्रतीक्षा लागलेली असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास निकाल जाहीर झाला.

Web Title: Kimaya Chaudhary of Oriya School of Jalgaon shines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.