...हा तर अमानुषतेला बळ देण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 07:42 PM2018-06-19T19:42:01+5:302018-06-19T19:42:01+5:30

वाकडीच्या घटनेत पीडित, शोषित घटकातील दोन मुलांना अमानुष वागणूक देण्यात आली; त्याचा संताप वाटण्याऐवजी त्याला जातीय, राजकीय स्वरूप देण्यात एक गट तर दुसरा गट हा प्रकार क्षुल्लक आहे आणि दोन शोषित घटकांमधला आहे, हे सांगत आहे.

This is the kind of force of inhumanity | ...हा तर अमानुषतेला बळ देण्याचा प्रकार

...हा तर अमानुषतेला बळ देण्याचा प्रकार

Next

- मिलिंद कुलकर्णी
पीडित समाजातील दोघांच्या नग्न धिंडीनंतर वाकडी गाव जगाच्या नकाशावर पोहोचले. कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी या घटनेचा निषेध केला तर केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले गावात येऊन गेले. काँग्रेसच्या अब्दुुल सत्तार यांच्याशी ग्रामस्थांनी वाद घातला. गावाची बदनामी होत असल्याचा कांगावा आता ग्रामस्थ करीत आहे. रस्त्याशेजारील शेतविहिरीत मुले पोहली; नागव्याने चार कि.मी. त्यांना पळवले गेले आणि नंतर मारहाण व धिंड काढली, तेव्हा ग्रामस्थ काय करीत होते?
वाकडीच्या घटनेने समाजमन ढवळून निघाले आहे. अवघ्या पाच हजार लोकवस्तीच्या गावात असा प्रकार घडतो, हे मानवजातीला लांछनास्पद आहे. परंतु त्या घटनेनंतर सुरू झालेला वाद-प्रतिवाद अधिक तार्किक वितंडवाद असून तो या अमानुषतेला अधिक बळ देणारा आहे.
शेतमालक, शेतगडी आणि ही दोन मुले यांच्यापुरती हा विषय असल्याची बतावणी आता एक गट करू लागला आहे. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत ही मुले पोहत होती; यापूर्वी त्यांना मज्जाव केला होता. त्यांच्या आई-वडिलांनाही कल्पना दिली होती. मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या अंगावर हात उगारला. आपण घरातही मुलांना मारतोच की...असा मानभावी युक्तिवाद केला गेला. भुसभुशीत पायावर उभा असा हा युक्तिवाद आहे. ईश्वर जोशी यांच्या रस्त्यालगतच्या शेतात दोन विहिरी आहेत. त्या गावात पाणीटंचाई नाही. प्रशासनाने कोणतीही विहीर अधिग्रहित केलेली नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा मुद्दा गैरलागू ठरतो. मुलांची सुरक्षितता म्हणून हात उगारला, असे जर म्हणणे असेल तर नग्न मुलांच्या मारहाणीचा व्हिडिओ काढण्याचे कारण काय? पट्ट्याने बेदम मारहाण करीत असताना व्हिडिओतील संवाद हा ‘प्रेमळ’ आहे काय? लाकडी दांडका घेऊन लोहार फक्त भीती घालत होता काय? व्हिडिओ चित्रण करणाऱ्या ईश्वर जोशीचे छद्मी हास्य काय दर्शवते? त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करून स्वत:च्या सत्ता, संपत्तीचे वर्चस्व दाखविण्याशिवाय कोणता हेतू असणार आहे?
ही दोन्ही मुले मातंग समाजातील आहेत आणि आरोपी हा ‘जोशी’ आडनावाचा असल्याचे कळताच ‘ब्राह्मणा’च्या विहिरीत घडलेला प्रकार अशी अपुºया माहितीवर आवई उठविली गेली. आरोपी हा भटक्या विमुक्त प्रवर्गातील नंदीबैल, हस्तरेषा बघणाºया घटकातील असल्याची माहिती लगेच दुसºया गटाने पुढे आणली. यातून दोन्ही गटांची असंवेदनशीलता दिसून आली. मुलांना नग्न करून मारहाण हा व्हिडिओमुळे जगजाहीर झालेल्या अमानुष प्रकार बाजूला पडून जातीपातीचा विषय चर्चेत आला.
पोलीस दलाची कामगिरी संमिश्र स्वरूपाची राहिली आणि त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात टीकेचे धनी ठरले. रविवारी घडलेल्या या घटनेविषयी तीन दिवस गुप्तता पाळण्यात आली. समझोता आणि दबाव असे दोन्ही प्रयत्न झाले असावे. गावातील पोलीस पाटील, ग्रामसेवक या शासकीय सेवकांनी त्यांचे कर्तव्य बजावलेले दिसत नाही, असाच विरोधकांचा आक्षेप आहे. पीडित मुलाच्या आईने दबावाला झुगारत तक्रार करण्याचा निर्णय घेतल्यावर तिला फत्तेपूर, पहूर आणि जळगाव असे पोलीस दलाकडे हेलपाटे घालावे लागले तेव्हा कुठे तक्रार नोंदवली गेली. गुन्ह्यांचे कलम योग्य असे लावले गेले असले तरी पोलीस अधीक्षकांच्या नावे काढलेल्या प्रसिद्धी निवेदनात आरोपींच्या जातीचा तपशील देण्यात आल्याने पोलीस दलाच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
आता राहिला मुद्दा गावाच्या बदनामीचा तर एवढे सगळे गावात घडत असताना गावाचे पुढारी काय करीत होते. जोशी यांची शेती आहे; तर पीडिताचे आई-वडील मोलमजुरी करणारे आहेत. दोन्ही घटकांच्या आर्थिक स्थितीवरून त्यांच्या गावातील स्थानाची कल्पना येते. विहिरीत पोहणाºया या मुलांवर अत्याचार केला तरी आम्हाला कोण विचारणार ही गुर्मी, मग्रुरी हे मूळ कारण आहे.
जातीयवाद, वर्चस्ववाद हा आहे. जातीसोबत सत्ता, संपत्तीला महत्त्व आल्याने गावागावात नवी सामाजिक उतरंड तयार झाली आहे. डावे, उजवे, परिवर्तनवादी सगळे या वास्तवाकडे डोळेझाक करून सोयीचे तत्त्वज्ञान, भूमिका रेटून नेत आहे. बदनामीची एवढी भीती असेल तर गावातील सर्वच समाजघटकांना समान स्थान आणि संधी मिळते काय? याची उत्तरे द्यावी लागणार आहेत.
जातीय सलोखा कायम ठेवा असे म्हणायला ठीक आहे. पण हा सलोखा बिघडविण्याचे काम राजकीय पक्ष करीत आहे, हे नाकारुन कसे चालेल. प्रत्येक गावात, धर्मात, जातीत, कुटुंबात भांडणे लावण्याची कामे राजकीय मंडळींनी केली आहेत. आणि आता हीच मंडळी उपदेश करते की, या प्रकाराला जातीय, राजकीय रंग देऊ नका.
वाकडी गावाकडे अजून दोन-चार दिवस लोकांचे पाय वळतील. पण नंतर या मुलांचे पुनर्वसन झाले काय? कुटुंब गावात कसे राहते आहे? दुसºया गावात पुनर्वसन करण्याचा विषय आला तर त्यांच्या रोजीरोटीचे, शिक्षण, घरादाराचे काय? हे प्रश्न आ वासून उभे राहतील. त्या वेळी कोणतेही शिष्टमंडळ त्यांच्या मदतीसाठी धावणार नाही, की मदत करणार नाही, हे माहीत असल्याने आता नाईलाजाने त्यांची भाषा बदलू लागली आहे, हे भयंकर आहे. समाजाविषयी अविश्वास निर्माण होत असेल तर पीडित, शोषितांना आपण आगीच्या दारात उभे करीत आहोत. त्यामुळे अमानुषतेला बळ देण्याची कृती कोणत्याही घटकाकडून न होता, हे प्रकरण शेवटापर्यंत नेण्याची आणि त्याची अन्यत्र पुनरावृत्ती होणार नाही, अशी जरब बसविण्याची आवश्यकता आहे.
वाकडीच्या घटनेचा डावे, उजवे, मध्यममार्गी या मंडळींनी निषेधाचाच सूर लावला. मात्र पुढे प्रत्येकाने आपापल्या विचारसरणीनुसार विधाने केली आणि कार्यपद्धती अंगिकारली. सत्ताधारी, प्रशासन यांच्यावर आरोप करून नेते मोकळे झाले. परंतु अशा घटना का घडतात, त्या रोखण्यासाठी काय करायला हवे, याविषयी सत्यशोधन, कारणमीमांसा करण्यास कुणाला वेळ नव्हता. तीन दिवस विलंबाने गुन्हा दाखल करणाºया पोलीस प्रशासनाने आरोपींची जात अधिकृत निवेदनाद्वारे जाहीर करून संशयाचे वातावरण अधिक गडद केले आहे.
नीलेश भिलचा विसर
पीडित घटकांच्या पुनर्वसनासाठी सामाजिक, स्वयंसेवी संस्था पुढे यायला धजावत नाही. स्वत:च्या कर्तुत्वाने राष्टÑीय बालशौर्य पुरस्कार मिळविणाºया मुक्तार्इंनगरच्या नीलेश भिलचे कौतुक तात्कालीक ठरले. त्याचे पलायन गाजले; परंतु परतल्यानंतर त्याच्या शैक्षणिक पुनर्वसनाची जबाबदारी घ्यायला केवळ केशवस्मृती प्रतिष्ठानसारखी संस्था पुढे आली. आताचे आंदोलक नीलेशला सोयीस्कर विसरले.

Web Title: This is the kind of force of inhumanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.