जनजागृतीसाठी व्याख्यानापेक्षा कीर्तन प्रभावी - हभप श्यामसुंदर सोन्नर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 09:11 PM2018-11-02T21:11:29+5:302018-11-02T21:13:31+5:30

समाजाला एकत्र आणण्याचे काम संतांनी केले

Kirtan Effective for Janajagruti | जनजागृतीसाठी व्याख्यानापेक्षा कीर्तन प्रभावी - हभप श्यामसुंदर सोन्नर महाराज

जनजागृतीसाठी व्याख्यानापेक्षा कीर्तन प्रभावी - हभप श्यामसुंदर सोन्नर महाराज

googlenewsNext
ठळक मुद्देप्रेम सुख घेई प्रेम सुख देईकर्मकांडात अडकलेल्या समाजास एकत्र आणण्याचे काम

जळगाव : शेतकरी आत्महत्या, स्त्री भ्रुणहत्या या सारख्या विषयांमध्ये व्याख्यानांपेक्षा कीर्तनातून मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली. ‘स्त्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास’ जनाबार्इंच्या ओवीतून होणारी जनजागृती मोठी परिणामकारक ठरत आल्याची माहिती हभप श्यामसुंदर सोन्नर यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या मुलाखतीत दिली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृती विवेक व्याख्यानमालेसाठी ते जळगावात आले असता, त्यांच्याशी संवाद साधला.
हभप सोन्नर म्हणाले, वारकरी संप्रदायास ७०० वर्षांची परंपरा आहे. संत नामदेव, संत चोखामेळा यांच्या सारख्या अनेक संतांनी एक चळवळ उभी केली. समाजमन अस्वस्थ असते त्यावेळी चळवळीची निर्मिती होते. भारतावर अनेक परकियांनी आक्रमण केले. बादशाही, निजामशाही, इंग्रज अशा अनेक सत्ता वेगवेगळ्या प्रांतात होत्या. या काळात अस्वस्थ समाजास एकत्र आणण्याचे काम संतांनी केले. दुबळ्यांवर कोणीही राज्य करू शकते. हे दुबळेपण कोणी दूर केले असेल तर ते वारकरी संप्रदायातील संतांनी. संत नामदेव यांनी अशा काळात जाती धर्माची बंधणे तोडून, कर्मकांडात अडकलेल्या समाजास एकत्र आणण्याचे काम केले.
वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाज घडविण्याची चळवळ ही संत ज्ञानेश्वरांनी सुरू केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा विडा उचलला त्या काळापर्यंत संत तुकाराम महाराज यांनी २१ अभंगांच्या माध्यमातून समाज मन घडविले. १८ पगड जातींना एकत्र आणले.
प्रेम सुख घेई प्रेम सुख देई
वारकरी संप्रदायापुढील अडचणींबाबत बोलताना हभप सोन्नर महाराज म्हणाले, अडचणी असल्या तरी वारकरी पंढरीच्या वाटेला निघतो त्यावेळी त्याने मनात एक निश्चय केला असतो. ‘प्रेम सुख देई प्रेम सुख घेई’ येणाऱ्या अडचणींवर मात करत तो पुढे जात असतो. पंढरपुुरात दिंडी येते त्यावेळी ज्या सुधारणा होतात त्या अगोदरच पूर्ण केल्या जाणे आवश्यक आहे. वेळेवर कामे होत असल्याने वाकºयांना त्रास होतो. पूर्वी फार सुविधा नसत मात्र आता आरोग्यासह विविध सुविधा दिल्या जातात.

Web Title: Kirtan Effective for Janajagruti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.