शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुकारलेले ‘किसान आंदोलन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:13 AM2020-12-08T04:13:45+5:302020-12-08T04:13:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकातील तरतुदी या शेतकरीविरोधी असून, यासाठी भारतभरातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी दिल्ली येथे ...

'Kisan Andolan' called by farmers for the benefit of farmers | शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुकारलेले ‘किसान आंदोलन’

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुकारलेले ‘किसान आंदोलन’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकातील तरतुदी या शेतकरीविरोधी असून, यासाठी भारतभरातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी दिल्ली येथे आंदोलन पुकारले आहे. भारतीय इतिहासातील सर्वात मोठे किसान आंदोलन असून, हे अहिंसक आंदोलन शेतकरी आपल्या एकजुटीने नक्कीच यशस्वी करून दाखवतील असा विश्वास लोकसंघर्ष मोर्च्याच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केला. केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाविरोधात दिल्ली येथे लाखो शेतकरी एकत्र आले आहेत. या आंदोलनाला समर्थन म्हणून प्रतिभा शिंदे या देखील २४ नोव्हेंबरपासून आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. ६ डिसेंबर रोजी त्या दिल्लीहून परत जळगावला आल्या आहेत. या ऐतिहासीक ‘किसान आंदोलना’तील त्यांचा अनुभव त्यांनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केला.

मागण्यांबाबत प्रत्येक शेतकरी जागृत

किसान आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना कृषी विधेयकाचा अभ्यास नसल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, या आंदोलनात सहभागी झालेल्या महाविद्यालयीन युवकापासून ते ज्येष्ठ नागरिकाला देखील आपल्या मागण्या व कृषी विधेयकातील शेतकरी विरोधी कायदा याबाबतची माहिती असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सर्व शेतकरी आता आपल्या न्याय व हक्कासाठी जागृत झाला असून, त्याचे हे मुर्तीमंत उदाहरण या आंदोलनात पहायला मिळत आहे.

खलिस्तानच्या घोषणा या केवळ अफवा

या आंदोलनात खलिस्तानबाबतच्या घोषणा देण्यात आल्या अशाही वावड्या पसरविल्या जात आहेत. मुस्लिमांनी आंदोलन केले तर त्यांना आंतकवादी म्हणून भाजप सरकारकडून हिनवले जाते. पुरोगाम्यांनी आंदोलन केले तर ते नक्षलवादी आता पंजाबसह संपुर्ण भारतातील शेतकरी एकत्र आला आहे. तर त्यांना खलिस्तानी चळवळ म्हणून चुकीचा प्रचार हा केला जात आहे. या आंदोलनात १५ दिवस काम केल्यानंतर या आंदोलनात केवळ शेतकरी व आपला भारतच केंद्रबिंदू असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे आंदोलनाला बदनाम करण्यासाठी सत्ताधारी व त्यांच्या ‘मोदी मीडिया’कडून हा आरोप केला जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातूनही पाठिंबा

दिल्ली येथे आंदोलन करण्याचे निश्चित झाल्यानंतर याठिकाणी दिल्लीला लागून असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष सहभागी होण्याचे ठरले होते. तसेच इतर राज्यातून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून विविध संघटनातील सदस्यांनी सहभागी होण्याचे ठरले होते. त्यानुसार महाराष्ट्रातून लोकसंघर्ष मोर्च्याचे २८० कार्यकर्ते व इतर संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. भविष्यात हे आंदोलन तीव्र केल्यानंतर राज्यातूनही शेतकरी सहभागी होणार आहेत. या आंदोलनाला संपुर्ण देशातील शेतकऱ्यांचा पाठींबा आहे.

Web Title: 'Kisan Andolan' called by farmers for the benefit of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.