किसान रेल्वेमधून पोहचतोय देशभरात डाळिंबाचा गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 12:44 AM2020-09-13T00:44:42+5:302020-09-13T00:45:40+5:30

आता किसान रेल्वे आठवड्यातून तीनदा चालविण्यात येत आहे.

Kisan is arriving by train | किसान रेल्वेमधून पोहचतोय देशभरात डाळिंबाचा गोडवा

किसान रेल्वेमधून पोहचतोय देशभरात डाळिंबाचा गोडवा

Next
ठळक मुद्दे११२७ टन डाळिंबाची वाहतूकनाशिक-पुणे-सोलापूर पट्ट्याला डाळिंबाचा पट्टा म्हणून प्रसिद्धी

भुसावळ : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरलेली किसान रेल्वे पौष्टिक आणि प्रतिकारशक्ती वाढवणारी डाळिंब उत्तर भारतात वाहून नेते. आतापर्यंत गेल्या एका महिन्यात ११०० टना पेक्षा जास्त वाहतूक झाली आहे. स्वस्त आणि वेगवान वाहतुकीच्या मागार्चा लाभ घेणारे शेतकरी उत्सुक व आनंदी आहेत. आता किसान रेल्वे आठवड्यातून तीनदा चालविण्यात येत आहे.
किसान रेल्वे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. नाशवंत माल जसे डाळींब, सीमला मिरची, फुलकोबी, लिंबू, हिरव्या मिरची, आईस्ड-फिश, जीवंत वनस्पती, अंडी आणि इतर भाज्याची वाहतूक महाराष्ट्रातील सांगोला, पंढरपूर, कोपरगाव, पुणे, दौंड, नाशिक, मनमाड या भागातून केली जात आहे. किसान रेल्वेने आतापर्यंत वाहून नेलेल्या एकूण नाशवंत मालापैकी ११२७.६७ टन डाळिंबची वाहतूक केली आहे. ज्याचे प्रमाण एकूण नाशवंत मालाच्या सुमारे ६१ टक्के आहे. किसान रेल्वे दि. ७ आॅगस्ट २०२० रोजी देवळाली ते दानापूर पर्यंतची साप्ताहिक सेवा म्हणून सुरू झाली आणि पुढे मुजफ्फरपूर पर्यंत विस्तारित करण्यात आली. त्यानंतर सांगोला / पुणे येथून मनमाड येथे लिंक रेल्वे जोडली जात आहे. आता किसान रेल्वे त्रि-साप्ताहिक म्हणून सुरु आहे. याला शेतकºयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
डाळिंबमध्ये एक प्रभावी पोषक घटक आहेत. ज्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम इत्यादींचा समावेश आहे. महाराष्ट्रात नाशिक, पुणे आणि सोलापूरमध्ये मोठया प्रमाणात उत्पादन होत आहे. राष्ट्रीय बागायती मंडळाच्या मते, डाळिंबाच्या राष्ट्रीय संशोधन केंद्राने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशातील एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ६३.९१ टक्के आहे.
कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या किसान रेल्वेमुळे नाशवंत वस्तूंची वेगवान वाहतूक, होते. नाशवंत वस्तूंची ताजी डिलिव्हरी, मालाच्या संख्येवर बंधन नाही, रस्त्यापेक्षा स्वस्त आणि टोलसह वाहतूक खर्चात बचत करणारी व त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकºयाच्या उत्पन्नात वाढ करण्याची आशा व संधी मिळाली आहे. रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या किसान रेल्वेमुळे वाहतुकीच्या इतर पद्धतींच्या तुलनेत वेळ कमी लागत आहे. ताजी वस्तू कमी वेळेत बाजारात जात असल्याने फळांच्या मागणीत वाढ होत आहे.

Web Title: Kisan is arriving by train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.