जळगावात भांडणातून एकावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:48 AM2018-04-28T11:48:12+5:302018-04-28T11:48:12+5:30

तरूण जखमी

Knife attack on one in Jalgaon controversy | जळगावात भांडणातून एकावर चाकू हल्ला

जळगावात भांडणातून एकावर चाकू हल्ला

Next
ठळक मुद्देपोलिसांनी संशयित तरूणाला घेतले ताब्यातगुन्हा दाखल

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २८ - आपआपसात कशाला भांडण करतात असे बोलल्याचा राग येऊन गणेश मच्छिंद्र कोळी (वय-२३ रा़ हर्षवर्धन कॉलनी) या तरूणास सचिन चव्हाण व ऋषिकेश पाटील (दोन्ही रा़पिंप्राळा) यांनी दोघांनी मारहाण केली़ यानंतर एकाने चाकूने वार करून गंभीर जखमी केले़ ही घटना मुक्ताईनगरातील हनुमान मंदिरासमोर गुरूवारी रात्री १० वाजता घडली़
याबाबत जिल्होपठ पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, ऋषिकेश यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़
गुरूवारी रात्री १० वाजता गणेश कोळी हा तरूण मुक्ताईनगरातील हनुमान मंदिरासमोरून कामावरून घरी जात होता़ त्यावेळी मंदिरसमोर तीन-चार ओळखी मुले भांडण करत असतांना दिसून आले. काय रे कशाला आपआपसात भांडण करता असे गणेश याने विचारले असता, त्याचा सचिन चव्हाण व ऋषीकेश पाटील या दोघांना राग आला़ दोघांनी गणेश यास शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरूवात केली़ यानंतर सचिन याने त्याच्या हातातील चाकूने गणेशवर वार केला़ यात गणेश हा गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला़ त्यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला़
जखमी अवस्थेत गणेश यास नातेवाईकांनी तात्काळ रिक्षात बसवून खाजगी रूग्णालयात उपचारार्थ नेले़

Web Title: Knife attack on one in Jalgaon controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.