डीजीसीएकडून विमान कंपनीला नाईट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:28 AM2021-02-06T04:28:28+5:302021-02-06T04:28:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नागरी हवाई वाहतूक संचालनालय अर्थात डीजीसीएतर्फे जळगावला विमानसेवा पुरविणाऱ्या विमान कंपनीला नुकतीच जळगाव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नागरी हवाई वाहतूक संचालनालय अर्थात डीजीसीएतर्फे जळगावला विमानसेवा पुरविणाऱ्या विमान कंपनीला नुकतीच जळगाव विमानतळावर नाईट लॅडिंगची अंतिम `ट्रायल `घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मात्र, विमान कंपनीकडे इतर ठिकाणच्या सेवा पुरविण्यासाठी सर्व विमाने बुकींग असल्यामुळे ट्रायलसाठी विमान कंपनीकडे जादा विमान नाही, त्यामुळे ट्रायलला विलंब होत असल्याची माहिती `ट्रू जेट` या विमान कंपनीचे वितरण व्यवस्थापक नैमिश जोशी यांनी दिली.
जळगाव विमानतळावर सध्या नाईट लॅडिंगचे काम पूर्ण झाले असून, विमान कंपनीतर्फे कमी दृश्यमानता असतानांही यशस्वीरित्या दोनदा विमान उतरविण्यात आले. यामुळे जळगाव विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र,डीजीसीएकडून विमान कंपनीला केव्हाही विमान उतरविण्यासाठी अंतिमत : परवानगी देण्यात आलेली नाही. डीजीसीएच्या नियमानुसार संबंधित विमान कंपनीने विमानात प्रवासी नसतांना, दोन दिवस वेगवेगळ्या वेळेत नाईट लॅडिंगची ट्रायल घेणे बंधनकारक आहे. ही ट्रायल विमान कंपनीने यशस्वी केल्यानंतरच डीजीसीएतर्फे विमान कंपनीला केव्हाही आणि विना परवानगी विमान उतरविण्याची परवानगी देणार आहे. दरम्यान, नाईट लॅडिंगच्या अंतिमत : ट्रायलसाठी विमान कंपनीतर्फे विमान शिल्लक नाही. सर्व विमान इतर ठिकाणी सेवा देण्यात व्यस्त आहेत. जेव्हा एखादी विमान रिकामे असेल, तेव्हा जळगाव विमानतळावर नाईट लॅडिंगची अंतिम ट्रायल घेण्यात येणार असल्याचे नैमिश जोशी यांनी सांगितले.