बोढरे येथील सोलर पीडित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मोरसिंग राठोड यांनी घेतली सोलर पीडितांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 02:40 PM2019-07-19T14:40:13+5:302019-07-19T14:41:21+5:30
भारतीय बहुजन क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मोरसिंग राठोड हे १७ रोजी सोलर पीडित शेतकऱ्यांंच्या भेटीसाठी बोढरे गावात आले असता, मोठ्या संख्येने तरुण, ज्येष्ठ मंडळी, माता भगिनींनी, वाजत-गाजत, जल्लोषात स्वागत केले व गावातून काढली भव्य मिरवणूक काढण्यात आली.
चाळीसगाव, जि.जळगाव : भारतीय बहुजन क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मोरसिंग राठोड हे १७ रोजी सोलर पीडित शेतकऱ्यांंच्या भेटीसाठी बोढरे गावात आले असता, मोठ्या संख्येने तरुण, ज्येष्ठ मंडळी, माता भगिनींनी, वाजत-गाजत, जल्लोषात स्वागत केले व गावातून काढली भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांनी त्यांच्यापुढे अन्यायाचा पाढा वाचला.
पीडित शेतकरी न्यायापासून वंचित असल्याचे भीमराव जाधव यांनी मोरसिंग राठोड यांच्या यावेळी निदर्शनास आणून दिले. पीडित शेतकºयांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या व्यथा समजून घ्यावेत यासाठी राठोड हे बोढरे गावात आले होते.
सभेत राठोड यांनी सांगितले की, माझ्या समाजावर अन्याय करणाºयांना कदापि माफी नाही. १२०० ऐकर जमिनी स्वस्तात लाटण्याºया कंपन्यांनी वेळीच सर्व पीडित शेतकºयांना कायदेशीर एकसमान योग्य तो मोबदला द्यावा अन्यथा प्रकल्प राहणार नाही. शेतकरी दोन वर्षांपासून न्यायासाठी झटत आहे, राज्य मंत्री राठोड यांच्याकडे तीन वेळा बैठका झाल्या. चौकशी अहवाल गेला तरी न्याय मिळत नसेल तर मग आपण आपल्या परीने न्याय देण्यास भाग पाडू. समाजातील लोक विविध पक्षात काम करत असतील हरकत नाही परंतु आपण जर समाजाला न्याय देत नसाल तर समाजाच्या नावाखाली त्या पक्षात लाचारवश राहू नका. सत्तेचा दुरूपयोग करून शेकडो एकर जमिनी सोलर कंपन्यांनी गैरमार्गाने कवडीमोल भावात हडप केल्या. एकाही नेत्याने आहे त्या पक्षात आवाज का बरे उचलला नाही. जीव धोक्यात घालून भीमराव जाधव व सहकारी लढताहेत. एकाही पक्षांनी याची दखल घेतली नाही. परंतु आता लक्षात ठेवा पीडित शेतकºयांच्या पाठीशी भारतीय बहुजन क्रांती दल पक्षाची साथ असणार आहे. समाजासाठी झटणाºया कार्यकर्त्यांना कोणी धमकी दिली तर गाठ मोरसिंग राठोडशी राहील, अशी धमकी देत या प्रस्थापितांना सत्तेची मस्ती आली आहे म्हणून हे अशाप्रकारे शेतकºयांवर अन्याय करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
सूत्रसंचालन अशोक राठोड यांनी केले. सभेस पृथ्वीराज चव्हाण, अंकुश राठोड, रमेश चव्हाण, रूंदन चव्हाण, राहुल चव्हाण, नवनाथ चव्हाण, धारासिंग राठोड, राम जाधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते